cotton procurement starts in Khandesh
cotton procurement starts in Khandesh 
मुख्य बातम्या

जळगाव जिल्ह्यात 'येथे' सुरु झाली हमीभावाने कापूस खेरदी

टीम अॅग्रोवन

जळगाव ः खानदेशात भारतीय कापूस महामंडळाने (सीसीआय) कापूस खरेदीला सुरवात केली असून, जळगाव जिल्ह्यात आव्हाणे (ता. जि. जळगाव) येथील लक्ष्मी कॉटस्पीन व पाचोरा येथील जिनींग प्रेसिंग कारखान्यात खरेदी केंद्रे सुरू केली आहेत.  कापसाची १२ टक्‍क्‍यांपर्यंतची आर्द्रता, ३.५ ते ४.३ टक्के मायक्रोनीयर (ताकद) व २९.५ ते ३०.५ मिलिमीटर लांब धाग्याच्या दर्जेदार कापसाला ५५५० रुपये दर दिला जाणार आहे. कमी दर्जाच्या किंवा अधिक आर्द्रतेच्या कापसाची खरेदी टाळली जाईल. २७.५ ते २८.५ मिलिमीटर लांब धागा, ३.५ ते ४.७ मायक्रोनीयरच्या कापसाला ५४५० रुपये प्रतिक्विंटलचा दर दिला जाईल. कापूस विक्रीसाठी आणताना कापूस पीक पेऱ्याची नोंद असलेला सातबारा उतारा, बॅंक पासबुकची झेरॉक्‍स, आधार कार्ड, आठ अ उतारा आणावा लागणार आहे. जळगाव येथील केंद्रात जिल्ह्यातून कापसाची आवक झाली. खरेदीच्या शुभारंभाला जळगाव बाजार समितीचे सभापती कैलास चौधरी, उपसभापती सुरेश पाटील, जिनींग प्रेसिंग कारखानदार लक्ष्मण पाटील, प्रकाश नारखेडे, अविनाश भालेराव आदी उपस्थित होते.  धुळे, नंदुरबारातही खरेदी सुरू होणार सीसीआयतर्फे खानदेशात धुळे जिल्ह्यात शिरपूर व नंदुरबारमधील शहादा व नंदुरबारातही कापूस खरेदी सुरू होणार आहे. मध्यंतरी शिरपूर येथे केंद्र सुरू केले होते. परंतु, अधिक आर्द्रतेचा कापूस येत असल्याने कापसाची खरेदी या केंद्रात थांबविण्यात आली होती.  पणनच्या खरेदीची प्रतीक्षा पणन महासंघाची कापूस खरेदी जळगाव, धुळे व नाशिक जिल्ह्यांत खरेदी करण्यासंबंधी स्थानिक अधिकारी, संचालक यांनी नियोजन केले. बुधवारी (ता. २०) खरेदी सुरू करण्यात येईल, असा दावा पणन महासंघाच्या सूत्रांनी केला होता. परंतु, खरेदीसंबंधीचे प्रस्ताव व इतर प्रक्रिया यास काही दिवस लागणार आहेत. यामुळे खानदेशात पणन महासंघाची कापूस खरेदी सुरू झालेली नसल्याची माहिती मिळाली. महासंघ जळगाव जिल्ह्यात अमळनेर, धरणगाव, पारोळा, धुळे, नाशिकमधील मालेगाव, येवला येथे खरेदी केंद्र सुरू करणार असल्याची माहिती मिळाली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Seed : सोयाबीन बियाणे दरात कंपन्यांकडून मोठी वाढ

Loksabha Election : देशातील ९३ जागांसाठी मोठ्या उत्साहात मतदान

Onion Export Duty : कांदा निर्यात शुल्क गोंधळाने कंटेनर खोळंबले

Fertilizers Rate : दरवाढीच्या अफवेने खत उद्योग हैराण

Indian Spices : भारतीय मसाल्यांच्या बदनामीचे षडयंत्र

SCROLL FOR NEXT