The coroner's disturbances Malegaon's sugar factorys Sugarcane sludge
The coroner's disturbances Malegaon's sugar factorys Sugarcane sludge 
मुख्य बातम्या

कोरोना’च्या संकटामुळे माळेगावचे गाळप विस्कळीत 

टीम अॅग्रोवन

माळेगाव, जि. पुणे ः माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांचा सव्वालाख टन ऊस एप्रिल महिना उजाडला तरी अद्याप शिवारात उभा आहे. ‘कोरोना’च्या समस्येमुळे विशेषतः बैलगाडी ऊसतोडणी कामगारांनी घराकडे जाण्याचा आग्रह धरल्याने कारखान्याची ऊस गाळप प्रक्रिया पूर्णतः विस्कळीत झाली आहे. कारखान्याची गाळप क्षमता प्रतिदिनी साडेसात हजार टन इतकी आहे. परंतु त्या तुलनेत कार्यस्थळावर उसाची उपलब्धता होत नाही. परिणामी प्रशासनाला अलिकडच्या काळात उसाअभावी कारखाना वारंवार बंद ठेवावा लागत आहे. 

माळेगावने आजवर ८ लाख चाळीस हजार टन गाळप उरकले आहे. अद्याप सभासदांचा सव्वालाख टन ऊस शिवारात शिल्लक असल्याने संबंधित सभासद चिंतेच आहेत. साखर आयुक्तांच्या आदेशान्वये साखर कामगारांसह ऊस तोडणी मजूरांचे आरोग्य व त्यांच्या खाण्यापिण्याची पूर्णतः काळजी घेतली जात आहे. बैलगाडी ऊस तोडणी कामगारांना समजावण्याचा प्रयत्न प्रशासनाच्या वतीने सुरू आहे. उर्वरित शिवारातील ऊसाचे गाळप कोणत्याही स्थितीत होण्यासाठी आवश्यकत्या उपाययोजना अंमलात आणल्या जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा ऊस शिवारात गाळपाअभावी शिल्लक राहणार नाही, अशी माहिती अध्यक्ष रंजन तावरे यांनी दिली. 

दरम्यान, माळेगाव कारखान्याने यंदाच्या हंगामात (सन २०१९-२०) आजवर ८ लाख ४० हजार ६२० मे.टन उसाचे गाळप केले आहे. त्यामध्ये सभासदांचा ४ लाख ७४ हजार, तर गेटकेनधारकांचा ३ लाख ६६ हजार गट ऊस गाळप झाला आहे. त्यानुसार ८ लाख ८३ हजार ४०० साखर पोत्यांची निर्मिती झाली आहे. तसेच रिकव्हरी १०.७४ इतकी मिळाली आहे. 

‘गावी जायची परवानगी द्यावी’  आम्हीही माणसे आहोत... ‘कोरोना’ रोग आम्हाला सोडणार आहे का ? आमची लेकरंबाळ गावाकडे उघड्यावर पडली आहेत. आमचे मन तिकडे आणि शरीर येथे आहे. ऊस तोडायला कसे मन तयार होईल... सांगाबर तुम्ही. आम्हाला आमच्या गावाकडे जायला परवानगी दिली पाहिजे, अशी आग्रही मागणी तुकाराम गोडाक यांच्यासह बहुतांशी ऊस तोडणी मजूरांनी केली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Animal Care : वाढत्या उष्णतेचा पशुधनास फटका

Public Well Policy : सार्वजनिक विहिरींच्या पुनरुज्जीवनावर धोरण काय?

Agriculture Irrigation : ‘म्हैसाळ’चे पाणी माडग्याळ शिवारात

Jalgaon Lok Sabha : ...तर जळगावचे चार खासदार पोहोचतील लोकसभेत

Banana Orchard Burn : सातपुड्याच्या पायथ्याशी केळी बागा करपल्या

SCROLL FOR NEXT