राज्यात रूग्णसंख्या दीड हजारांच्या पुढे; कोरोनामुळे राज्यात काल १३ रुग्णांचा मृत्यू
राज्यात रूग्णसंख्या दीड हजारांच्या पुढे; कोरोनामुळे राज्यात काल १३ रुग्णांचा मृत्यू 
मुख्य बातम्या

राज्यात रूग्णसंख्या दीड हजारांच्या पुढे; कोरोनामुळे राज्यात काल १३ रुग्णांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

पुणे : राज्यातील १८८ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी गेले असून त्याच वेळी २१० नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णांची संख्या एक हजार ५७४ वर पोचली असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य खात्यातर्फे देण्यात आली. राज्यात गेल्या शुक्रवारी (ता.१०) चोवीस तासांमध्ये १३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात मरण पावलेल्यांमध्ये मुंबई येथील दहा तर, पुण्यातील एका रुग्णांचा समावेश आहे. आज मरण पावलेल्यांमध्ये ९ पुरूष आणि चार महिला आहेत, असे आरोग्य खात्यातर्फे सांगण्यात आले. आज झालेल्या १३ मृत्यूपैकी ६ जण हे ६० वर्षांवरील आहेत ५ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ६० वर्षे या वयोगटातील आहेत तर दोघेजण ४० वर्षांपेक्षा लहान आहेत. मृत्युमुखी पडलेल्या ११ रुग्णांमध्ये (८५ %) मधुमेह, उच्च रक्तदाब, अस्थमा, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूची संख्या आता ११० झाली आहे. आजपर्यंत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या ३३०९३ नमुन्यांपैकी ३०४७७ जणांचे प्रयोगशाळा नमुने निगेटिव्ह आले आहेत तर १५७४ जण पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत १८८ कोरोना बाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात ३८९२७ व्यक्ती घरगुती विलगीकरण असून ४७३८ जण संस्थात्मक क्वारंटाईन मध्ये आहेत. राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात या प्रकारे एकूण ४ हजार ३७४ सर्वेक्षण पथके काम करत असून त्यांनी साडेसोळा लाखांहून अधिक लोकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. 

मुंबईतील स्थिती चिंताजनक  राजधानी मुंबईतील कोरोनाचा संसर्ग वाढत चालला असून शुक्रवारी (ता.१०) दिवसभरात २१८ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे. आता मुंबईतील बाधितांची संख्या ९९३ एवढी झाली आहे. राज्यातील रूग्णांची संख्या १ हजार ५४७ एवढी झाली आहे. मुंबईतील वाढते बाधित लक्षात घेता तेथे लॉकडाउनचे नियम कठोर केले जाणार आहेत असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले. मुंबईत एका दिवसात कोरोनामुळे १० रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर आत्तापर्यंत मरण पावलेल्यांची संख्या ६४ वर पोचली आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weather Update : अकोला, सोलापुरात हंगामातील उच्चांकी तापमान

Indian Politics : चीनवरून काँग्रेसचा मोदी सरकारवर पुन्हा हल्लाबोल

Accident Insurance Scheme : अपघात विमा योजनेतून ४५० शेतकरी कुटुंबांना मदत

Banana Sunburn : उन्हाच्या तीव्रतेमुळे जळताहेत केळीची रोपे

Summer Heat : मालेगावात वैशाखाआधीच वणवा

SCROLL FOR NEXT