मेथी
मेथी 
मुख्य बातम्या

सोलापुरात कोथिंबीर, मेथी, शेपूचे दर वधारले

Sudarshan Sutaar

सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात कोथिंबीर, मेथी, शेपूची आवक कमीच राहिली. आवक कमी असली, तरी मागणी वाढल्याने भाज्यांचे दर काहीसे वधारल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात कोथिंबीर, मेथीची रोज साधारपणे पाच ते सहा हजार पेंढ्या आणि शेपूची ३ हजार पेंढ्यांपर्यंत आवक राहिली. भाज्यांची सगळी आवक स्थानिक भागातून झाली. या आधीच्या सप्ताहाच्या तुलनेत आवकेत जवळपास निम्म्याने घट झाली. शिवाय गेल्या काही दिवसांपासून भाज्यांच्या दरात मोठी घसरण झाली होती. पण या सप्ताहात भाज्यांना मागणी वाढली. विशेषतः मेथी, शेपूला चांगला उठाव मिळाला. मेथीला शंभर पेंढ्यांसाठी ७०० ते १००० रुपये, कोथिंबिरीला ५०० ते ७०० रुपये आणि शेपूला ४०० ते ५०० रुपये असा दर मिळाला. त्याशिवाय वांगी, ढोबळी मिरची यांच्या दरात काहीशी सुधारणा झाली. त्यांची आवक मात्र रोज ५० ते २०० क्विंटलपर्यंत राहिली. वांग्याला प्रतिदहा किलोसाठी किमान ६० ते १०० रुपये आणि ढोबळी मिरचीला ८० ते १३० रुपये असा दर मिळाला. गवार, भेंडी आणि हिरव्या मिरचीच्या दरातील तेजी या सप्ताहातही पुन्हा कायम राहिली. गवारला प्रतिदहा किलोसाठी २०० ते ३५० रुपये, भेंडीला १५० ते ३०० रुपये आणि हिरव्या मिरचीला १८० ते २०० रुपये असा दर मिळाला. कांद्याचे दर पुन्हा जैसे थे राहिले. कांद्याची आवकही घटली. कांद्याची रोज ५० ते ८० गाड्यांपर्यंत आवक होती. कांद्याला प्रतिक्विंटल १०० ते ८०० व सरासरी ५५० रुपये असा दर मिळाला. द्राक्षाला पेटीला सर्वाधिक ७० रुपये द्राक्षाची आवक या सप्ताहात काहीशी कमी झाली; पण मागणीमुळे या आधीच्या सप्ताहाच्या तुलनेत दर मात्र काहीसे टिकून राहिले. द्राक्षाच्या चार किलोच्या २०० ते ३०० पेट्या रोज आवक होती. मुख्यतः पंढरपूर, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर भागातून ही आवक झाली. द्राक्षाला चार किलोच्या पेटीला ४० ते ७० व सरासरी ५५ रुपये असा दर मिळाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Lemon Rate : लिंबाचे दर पोहोचले ६,५०० रुपयांवर

Hirda Picking : जुन्नर तालुक्यात हिरडा गोळा करण्याची लगबग

Yedgaon Dam Victim : येडगाव धरणग्रस्त शेतकऱ्यांसाठी धरणात पाणीसाठा राखून ठेवावा

Interview with PM Narendra Modi : आर्थिक विकासाची महाराष्ट्रासाठी ‘गॅरंटी’

Sugar Market : कोट्यापेक्षा जादा साखर विक्री कारखान्यांना पडली महागात

SCROLL FOR NEXT