सिद्धेश्वर यात्रेची कामे समन्वयाने करा : शिवाजी जगताप
सिद्धेश्वर यात्रेची कामे समन्वयाने करा : शिवाजी जगताप  
मुख्य बातम्या

'सिद्धेश्वर यात्रेची कामे समन्वयाने करा'

टीम अॅग्रोवन

सोलापूर : सिध्देश्वर यात्रा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सर्व विभाग, यात्रा कमिटी आणि देवस्थान पंच कमिटीने प्रशासनास सहकार्य करावे, यात्राविषयक कामे समन्वयाने करावीत, असे आवाहन उपविभागीय अधिकारी शिवाजी जगताप यांनी केले.        

सिद्धेश्वर यात्रा २०१९ संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सेतू सभागृहात बैठक झाली. महापालिका, पोलिस, महावितरण, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन, आरोग्य विभागाचे संबधित अधिकारी, सिद्धेश्वर यात्रा कमिटी आणि देवस्थान पंच कमिटीचे पदाधिकारी उपस्थित होते.

जगताप म्हणाले, ‘‘यात्रा कालावधीत आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे. भाविकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यास प्राधान्य द्यावे. आवश्यक ठिकाणी सी.सी.टी.व्ही. लावावेत. पिण्याचे पाणी, पुरेशी शौचालये, आरोग्य विभाग पथक कार्यरत ठेवावे. अत्यावश्यक औषध साठा उपलबध ठेवावा. वाहनाच्या पार्किंगसाठी पार्किंग झोन करावेत.’’

होम मैदान आणि स्टॉलसंदर्भात महापालिका आयुक्ताकडे बैठक घ्यावी, असेही ते म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Rate : वाढत्या उन्हामुळे साखरेला मागणी, दरातही वाढ

Food Security Scheme : अन्नसुरक्षा योजनेत पुरवल्या अप्रमाणित निविष्ठा

Jowar Market : पंचवीस हजार क्विंटल ज्वारीची कमी दराने विक्री

Heat Wave Maharashtra : उन्हाच्या चटक्याने राज्य होरपळले

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

SCROLL FOR NEXT