अमेरिकन लष्करी अळी
अमेरिकन लष्करी अळी  
मुख्य बातम्या

अमेरिकन लष्करी अळीचे बीजप्रक्रियेद्वारे नियंत्रण

Vinod Ingole

नागपूर : देशात अमेरिकन लष्करी अळीच्या नियंत्रणाचे तंत्रज्ञानच उपलब्ध नसल्याने अखेर शेतकऱ्यांच्या अनुभवाचा वापर करण्याचे केंद्र सरकारने नियोजन केले आहे. या अनुभवांवर आधारित बीज प्रक्रिया उपाययोजनेस भारतीय कृषी संशोधन परिषदेकडून (आयसीएआर) केंद्रीय कृषी विभागाला आणि त्यांच्याद्वारे सर्व राज्यांना शिफारसीत करण्यात आल्याचे वास्तव समोर आले आहे.   या संबंधित संयुक्त कीटकनाशकाच्या बीज प्रक्रियेसाठीच्या चाचण्या भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या एआयसीआरपी या कार्यक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या नाहीत. तथापि शेतकऱ्यांच्या अनुभावानुसारच आधारित या कीटकनाशकांची शिफारस करण्यात आली आहे. मका पिकावर अमेरिकन लष्करी अळीचा पहिल्यांदा कर्नाटका त्यानंतर आंध्र प्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्रात प्रादुर्भाव दिसून आला. ही कीड मक्‍याची पाने खाते; त्याचा उत्पादकतेवर परिणाम होतो. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढीस लागली आहे. अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव गेल्या ९ ते १० महिन्यांपूर्वी पहिल्यांदा दिसून आला. इतका प्रचंड कालावधी लोटल्यानंतरदेखील या किडीच्या नियंत्रणासाठी भारतीय कृषी संशोधन परिषदेकडून अपेक्षित हालचाली होत नसल्याबद्दल आश्‍चर्य व्यक्‍त केले जात आहे. त्यामुळेच इतर अनेक राज्येदेखील या किडीने आपल्या कवेत घेण्यास सुरवात केली आहे. मक्‍यासोबतच उसाची पानेदेखील या किडीचा आहार ठरतो. त्यामुळे ऊस उत्पादकही जेरीस आले आहेत.  दरम्यान अमेरिका मूळ असलेल्या या किडीचे संपूर्ण निवारण अमेरिकेलादेखील आजवर शक्‍य झाले नाही. त्यामुळे या किडीचा प्रसार अधिक होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. दोन ते तीन आठवडेच मिळते नियंत्रण सायएॅन्ट्रानिलीप्रोल १९.८ टक्‍के + थायामेथोक्झाम १९.८ टक्‍के या संयुक्त कीटकनाशक प्रति किलोसाठी चार मिलि याप्रमाणे वापरून बियाणे प्रक्रियेची शिफारस करण्यात केंद्रीय कृषी मंत्रालयाने भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या शिफारसीवरून केली आहे. यामुळे लागवडीनंतर दोन ते तीन आठवडेच अमेरिकन लष्करी अळीपासून नियंत्रण मिळणे शक्‍य होते, हे शेतकऱ्यांच्या अनुभवातून पुढे आल्याचे कृषी मंत्रालयाने म्हटले आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Season : देशातील साखर हंगाम अंतिम टप्प्यात

Weather Update : कोकणात उन्हाचा चटका ठरणार तापदायक

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

SCROLL FOR NEXT