Continue Agricultural Services, integrity Centers: Union Minister of State Dhotre
Continue Agricultural Services, integrity Centers: Union Minister of State Dhotre 
मुख्य बातम्या

कृषिसेवा, निविष्ठा केंद्रे सुरू ठेवा ः केंद्रीय राज्यमंत्री धोत्रे 

टीम अॅग्रोवन

अकोला ः ‘कोरोना’ विषाणू संसर्ग प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या संचारबंदीच्या कालावधीत जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्र व कृषी निविष्ठा केंद्र सुरू ठेवावीत, असे निर्देश केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. त्यानुसार जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी यासंदर्भातील आदेश काढले आहेत. 

केंद्रीय राज्यमंत्री धोत्रे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. यावेळी आमदार रणधीर सावरकर उपस्थित होते. जिल्हाधिकारी पापळकर, मनपा आयुक्त संजय कापडणीस, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवहरी घोरपडे, निवासू उपजिल्हाधिकारी संजय खडसे, तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते. 

श्री. धोत्रे म्हणाले की, शेतकऱ्यांचे काम थांबू नये, त्यास अडचण निर्माण होऊ नये म्हणून यासाठी जिल्ह्यातील कृषी निविष्ठा व कृषी सेवा केंद्र सुरू ठेवावे. जेणेकरुन शेतकऱ्यांना सुविधा होईल. तसेच जिल्ह्यातील रेशन दुकानदारांनी गोरगरिबांना तीन महिन्यांचे अन्नधान्य वाटप करण्यास सुरुवात करावी. धोत्रे यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी पापळकर यांनी जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्र व कृषी निविष्ठा केंद्र अत्यावश्यक सेवा म्हणून सकाळी ११ ते दुपारी तीन यावेळेत सुरू ठेवण्याचे निर्देश जारी केले. 

या निर्देशानुसार या केंद्रांवर पाच पेक्षा अधिक कर्मचारी कामगार काम करणार नाहीत, दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी होणार नाही व ग्राहकांमध्ये किमान आवश्यक अंतर ठेवण्याची कार्यवाही करण्याची अटही नमूद करण्यात आली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Seed : सोयाबीन बियाणे दरात कंपन्यांकडून मोठी वाढ

Loksabha Election : देशातील ९३ जागांसाठी मोठ्या उत्साहात मतदान

Onion Export Duty : कांदा निर्यात शुल्क गोंधळाने कंटेनर खोळंबले

Fertilizers Rate : दरवाढीच्या अफवेने खत उद्योग हैराण

Indian Spices : भारतीय मसाल्यांच्या बदनामीचे षडयंत्र

SCROLL FOR NEXT