महावितरण
महावितरण 
मुख्य बातम्या

ग्राहक पंचायतीचा 'महावितरण'ला दणका

टीम अॅग्रोवन

नाशिक : कृषिपंपधारकांवर थकित वीजबिलापोटी वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई महावितरणने सुरू केली आहे. मात्र अनेक शेतकऱ्यांना रीडिंग न घेताच अव्वाच्या सव्वा वीजबिले दिली. ग्राहक पंचायतीने अशा एका प्रकरणात चांदोरी येथील शेतकऱ्यास १० हजार रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले आहे.  सध्या कृषिपंपांच्या थकीत बिलापोटी वीजपुरवठा खंडित केला जात आहे. नाशिक शहर मंडलातील १ लाख ६५ हजार कृषिपंप ग्राहकांकडे ५९१ कोटी रुपयांची थकबाकी आहे. यातील १ लाख ६४ हजार ग्राहकांकडे ४३ कोटी रुपयांची चालू बिले थकीत आहेत. मालेगाव मंडलातील १ लाख ३९ हजार कृषिपंप ग्राहकांकडे ५९२ कोटी रुपयांची वीजबिले थकीत असून यातील १ लाख ३८ हजार ३०० ग्राहकांकडे ३५ कोटी ४२ लाख रुपयांची चालू थकबाकी आहे. मात्र थकबाकी असलेल्या अनेक शेतकऱ्यांना मीटर रिडींग न घेताच अंदाजे बिले प्राप्त झाली. यापैकीच चांदोरी येथील शेतकरी जगन्नाथ नाठे यांना ३२ हजार रूपये वीज बील प्राप्त झाले. यासंदर्भात त्यांनी ग्राहकपंचायतीकडे धाव घेतली असता वीज कायदा २००३ सेक्शन ५५ व ५७ तसेच भरपाईचा कायदा २००५ नुसार अंदाजे दिलेले बिल बेकायदा असून त्याबद्दल प्रतीमाह ४०० रुपयेप्रमाणे १० हजार रुपये भरपाई देण्याचे आदेश दिले. तसेच अंदाजे बिल व प्रत्यक्ष रीडिगनुसार बिल यातील फरक संबधित मीटर रीडर इंजिनिअर यांच्या पगारातून कापण्यात यावा, असेही या आदेशात म्हटले आहे. नाठे यांना ३२ हजार रुपये बिल आले होते. मात्र, प्रत्यक्षात ८ हजार रुपये बिल झाले. त्यांना १० हजार रुपये भरपाई मिळवून देण्यात आली. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना अशा प्रकारची अंदाजे बिले प्राप्त झाली असतील त्यांनी वीज ग्राहक तक्रार समिती विद्युत भवन नाशिक रोड येथे तक्रार दाखल करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Season : देशातील साखर हंगाम अंतिम टप्प्यात

Weather Update : कोकणात उन्हाचा चटका ठरणार तापदायक

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

SCROLL FOR NEXT