abd
abd  
मुख्य बातम्या

संशोधनासाठी मोसंबी वाणांचे जतन फायदेशीर : कृषी सचिव एकनाथ डवले

टीम अॅग्रोवन

बदनापूर, जि. जालना : मोसंबी फळपिकांच्या विविध वाणांचा संग्रह करून त्याचे संवर्धन केल्यास भविष्यातील संशोधनास चालना मिळण्यास मोठा हातभार लागेल, असे प्रतिपादन कृषी सचिव एकनाथ डवले यांनी केले. मोसंबी संशोधन केंद्र व तूर संशोधन केंद्रास नुकत्याच दिलेल्या भेटीप्रसंगी ते बोलत होते. या वेळी त्यांच्यासमवेत कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गिरीधारी वाघमारे, मोसंबी संशोधन केंद्राचे प्रमुख शास्रज्ञ डॉ. संजय पाटील, तूर संशोधन केंद्राचे डॉ. दीपक पाटील, कृषी सहसंचालक दिनकर जाधव, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे, कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक सचिन सूर्यवंशी आदी उपस्थित  होते. या वेळी केंद्रात नव्याने लागवड करण्यात आलेल्या अलीमो, रंगपूर या खुंटाची तसेच विक्रम, प्रमालिनी, अकोला बहार, साई सरबती, एनआरसी ७, ८ चक्रधर आदी लिंबू वाणाची आणि नुसेलर, काटोल गोल्ड, पॅरा, जाफा, ब्लड रेड, वॉशिंग्टन, हमलीन आदी मोसंबी वाणांची माहिती केंद्राचे प्रमुख डॉ. संजय पाटील यांनी दिली.  या वेळी श्री. डवले म्हणाले कि, या केंद्रास विविध वाणांचे जतन व संग्रह व संशोधन करण्यासाठी शासन सर्वतोपरी आर्थिक मदत देईल. त्यासाठी केंद्राने रीतसर प्रस्ताव सादर करावा. याचा फायदा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात होईल. तसेच वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने प्रसारित केलेल्या विक्रम आणि प्रमालिनी या चांगल्या लिंबू वाणांचा अधिकाधिक प्रचार व प्रसार करण्यावर भर द्यावा. केंद्रातील संशोधन सहायक त्रिवेणी सांगळे यांनी आभार मानले. संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. डी. के. पाटील यांनी श्री. डवले यांना संशोधनासाठी संग्रहित पिकांच्या जातीचे वाईल्ड गार्डन, बीजोत्पादन आदींविषयी सविस्तर माहिती दिली. संशोधनाचे कार्य , त्यातील बारकावे जाणून घेण्यासोबतच येणाऱ्या अडचणीही जाणून घेतल्या.  या वेळी केंद्राच्या माध्यमातून आवश्यक शास्त्रज्ञ, कर्मचारी आदी मनुष्यबळाची तसेच मोसंबी संशोधन केंद्र, तूर संशोधन केंद्र, डाळवर्गीय पीक संशोधन केंद्र, कृषी महाविद्यालय आदी पाहता सर्वांना उपयोगी पडेल, अशी केंद्रीय मध्यवर्ती सुधारित प्रयोगशाळा आवश्यक असल्याची व त्यासाठी शासनाचा पुढाकार आवश्यक असल्याची माहिती सचिव श्री. डवले यांना देण्यात आली.

उडीद वाणाच्या संशोधनावर हवा भर तूर, मूग व इतर पिकांच्या वाणात दखलपात्र संशोधन झाले आहे. त्या तुलनेत उडिदाच्या संशोधनात मात्र आपण मागे आहोत. त्यामुळे यापुढील काळात उडिदाच्या संशोधनात विशेष लक्ष देण्याची गरज सचिव एकनाथ डवले यांनी व्यक्त केली. बदनापूर येथील तूर संशोधन केंद्राच्या भेटीप्रसंगी ते बोलत होते.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Rain : वादळी पावसाने टोमॅटो, मिरची, भेंडीसह ऊस पीक उद्धवस्त, नुकसान भरपाई मिळणार कधी?

Konkan Ranmeva : कोकणच्या रानमेव्यावर वातावरणाचा परिणाम, अनेकांचे आर्थिक गणित कोलमडणार

Agrowon Podcast : हळदीचे भाव तेजीतच; कापूस, सोयाबीन, गहू, लिंबू यांचे काय आहेत दर पाहुयात?

Ethanol Production : कांदा उत्पादकांच्या पाठोपाठ ऊस उत्पादकांनाही सरकारनं घोषणा करून भूलवलं ? | शेतीच्या बातम्या

Maharashtra Rain : राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा; देशातील अनेक भागात तापमानाचा पारा ४२ ते ४६ अंशाच्या दरम्यान

SCROLL FOR NEXT