'ईव्हीएम'ऐवजी आता मतपत्रिकांचा वापर व्हावा : कॉंग्रेस
'ईव्हीएम'ऐवजी आता मतपत्रिकांचा वापर व्हावा : कॉंग्रेस 
मुख्य बातम्या

'ईव्हीएम'ऐवजी आता मतपत्रिकांचा वापर व्हावा : कॉंग्रेस

वृत्तसेवा

नवी दिल्ली : आगामी निवडणुकांमध्ये इलेक्‍ट्रॉनिक व्होटिंग मशिनऐवजी (ईव्हीएम) मतपत्रिकांचा वापर करण्याचे आवाहन कॉंग्रेसकडून शनिवारी (ता.१७) निवडणूक आयोगाला करण्यात आले आहे. निवडणुकांमध्ये ईव्हीएमचा गैरवापर करण्यात येत असल्याचा आरोप कॉंग्रेससह इतरही राजकीय पक्षांकडून केला जात आहे. आगामी निवडणुकांमध्ये "ईव्हीएम'ऐवजी पारंपरिक मतपत्रिकांचा वापर करण्याची विनंती करणारा ठराव कॉंग्रेस पक्षाच्या येथे आयोजित 84 व्या महाअधिवेशनात करण्यात आला. "ईव्हीएम'चा गैरवापर होत असल्याबद्दल कॉंग्रेसकडून चिंता व्यक्त करण्यात आली. निवडणूक प्रक्रियेची विश्‍वासार्हता टिकवून ठेवण्यासाठी जगभरातील मोठ्या लोकशाही राष्ट्रांनी मतपत्रिकांचा निवडणुकीत वापर पुन्हा सुरू केला असल्याचा दावा कॉंग्रेसकडून करण्यात आला आहे. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्रितपणे घेण्याचा भाजपचा प्रस्ताव हा घटनेच्या तत्त्वांना धरून नाही, तसेच तो अव्यवहार्य आहे, असे कॉंग्रेसच्या ठरावामध्ये नमूद करण्यात आले आहे. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा 2019 च्या निवडणुकीत पराभव करण्यासाठी समविचारी पक्षांना सोबत घेण्याचा कॉंग्रेस प्रयत्न करणार असल्याचेही ठरावात म्हटले आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

Agriculture Share : शेती निम्म्या हिश्‍शाने देण्याकडे शेतकऱ्यांचा कल

Orchard Cultivation : ‘मनरेगा’अंतर्गत फळबाग लागवडीत कृषी विभाग अव्वल

Agrowon Sanvad : आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने शेती करावी

SCROLL FOR NEXT