cotton procurement
cotton procurement 
मुख्य बातम्या

कापूस खरेदीबाबत यंत्रणांमध्येच गोंधळाची स्थिती 

Vinod Ingole

नागपूर ः राज्यात कापूस खरेदीबाबत पणन सचिवांकडून आदेश देण्यात आले असले तरी राज्यात किती केंद्रावर ही खरेदी सुरु होईल किंवा सुरु होणारच नाही याबाबत मात्र स्पष्टता नसल्यामुळे गोंधळ उडण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. सीसीआयने आम्ही कधीच खरेदी बंद केली नाही, असा दावा केला असून आम्ही खरेदीस तयार आहोत, असा खुलासा केला. पणन महासंघाने ऑनलाईन नोंदणी करण्यात आलेल्या केंद्रावर रोज वीसच्या संख्येतील वाहनांमधून कापूस खरेदीस तयार असल्याचे सांगितले. 

राज्यात यावर्षी ४३.८४ लाख हेक्‍टरवर कापसाची लागवड करण्यात आली. त्यामाध्यमातून ४२५ लाख क्‍विंटल कापसाची उत्पादकता अपेक्षीत आहे. त्यामध्ये १७५ लाख क्‍विंटल विदर्भात तर मराठवाडा व खांदेश भागात २५० लाख क्‍विंटल कापसाचे उत्पादन झाल्याची माहिती ज्येष्ठ कापूस तज्ज्ञ गोविंद वैराळे यांनी दिली. पणन महासंघ तसेच सीसीआयकडून आजवर खरेदी करण्यात आलेल्या कापसानंतरही शेतकऱ्यांच्या घरात ८० लाख क्‍विंटल कापूस शिल्लक आहे. त्यामध्ये विदर्भात ३० लाख तर उर्वरित महाराष्ट्रात ४५ ते ५० लाख क्‍विंटल कापसाचा समावेश आहे. या कापसाची खरेदी करण्यात यावी, अशी मागणी होत होती. 

‘ॲग्रोवन’मधून देखील हा प्रश्‍न मांडण्यात आला. त्याची दखल घेत राज्य सरकारने सोमवार (ता.२०) पासून खरेदी सुरु करण्याचे आदेश दिले. राज्यात सीसीआयचे ८५ तर पणन महासंघाचे ७४ केंद्राव्दारे १२७ फॅक्‍टरीमध्ये खरेदी सुरु आहे. लॉकडाऊनच्या काळात खरेदी करताना महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ व सीसीआयकडून टप्याटप्याने खरेदी केंद्र सुरु करण्यात येतील, असे सांगण्यात आले. ज्या केंद्रावर कापूस येईल, तो आम्ही खरेदी करु असे सीसीआयच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. पणन महासंघ आधी नोंदणी केलेल्या केंद्रावर रोज २० वाहनातील कापूस खरेदी करणार आहे. त्यामुळे किती केंद्र सुरु होतील आणि कोठे खरेदी होईल याबाबत सीसीआयने देखील अनभिज्ञता व्यक्‍त केली आहे.  रुईची टक्‍केवारीचा निकष  सीसीआयने दर महिन्याला कापसातील रुईची टक्‍केवारी वाढती असावी त्यासोबतच एक क्‍विंटल कापसावर प्रक्रिया केल्यानंतर रुई व सरकीतील वजनात देखील घट प्रत्येक महिन्याला कमी यावी, अशी अट जिनींग व्यवसायीकांवर टाकली आहे. जिनींग व्यवसायीकांमध्ये या धोरणाबद्दल नाराजी आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weather Update : विदर्भात गारपिटीचा इशारा

Agriculture Update : गुणवत्तापूर्ण बियाणे, खते शेतकऱ्यांना द्या : इटनकर

Summer Weather : परभणीत दिवसाचा पारा ४३ अंशांवर

Water Stock : मराठवाड्यातील उपयुक्त पाणीसाठा ७ ते ८ टक्क्यांवर

Flower Rate : लग्नसराईमुळे फुलांच्या दरांत वाढ

SCROLL FOR NEXT