Confusion about Khandesh pilgrimage this year
Confusion about Khandesh pilgrimage this year 
मुख्य बातम्या

खानदेशातील यात्रोत्सवांबाबत यंदा संभ्रम

टीम अॅग्रोवन

सारंगखेडा, जि. नंदुरबार : कार्तिकी एकादशी नंतर यात्रांना सुरवात होते. यात्रा हेच उदरनिर्वाहाचे साधन असलेल्या खानदेशातील लाखाहून अधिक व्यावसायिकाच्या अर्थकारणावर यात्रांचा प्रभाव आहे. समाजव्यवस्था टिकवून ठेवणारा महत्त्वाचा घटक आहे. सद्य परिस्थितीत खानदेशातील विविध प्रसिद्ध यात्रा भरणार की नाही, याविषयी कोणीही नेमकेपणाने सांगू शकत नसल्याने याबाबत संभ्रम कायम आहे.

दरवर्षी कार्तिकी नंतर महिन्याभरात खानदेशातील सर्वात मोठी यात्रा सारंगखेडा (ता.शहादा) येथे भरते. यात्रे बरोबर गेल्या पाच वर्षांपासून चेतक फेस्टिव्हल भरविला जातो. याच्या नियोजनासाठी तीन महिने अगोदरच जिल्हास्तरीय बैठक होते.

कोरोनामुळे सारंगखेडा यात्रोत्सवाच्या निमित्ताने कोणतीही बैठक आतापर्यंत झाली नसल्याने व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम आहे. येथील यात्रोत्सवाला साडे चारशे वर्षाची परंपरा आहे. येथे देशाच्या कानाकोपऱ्यांतून घोडे खरेदी, विक्रीसाठी अश्वप्रेमी येतात.  

कोरोनामुळे मोठ्या उद्योगांवर संकट आले. हजारो लोक बेरोजगार झाले. त्याच बरोबर छोटया व्यावसायिकांनाही धक्का बसला आहे. या वर्षी यात्रा नाही भरली, तर आगामी वर्षभर आर्थिक व्यवस्था कशी करावयाची, अशा विवंचनेत व्यावसायिक आहेत. कोरोनाचा संसर्ग येत्या काही दिवसांत कमी झाला, तर कार्तिकीनंतर भरणाऱ्या यात्रोत्सवांचा विचार होऊ शकेल. अन्यथा, गर्दीमुळे संसर्ग पुन्हा पसरू नये, यासाठी धोका न पत्करता यात्रोत्सव रद्द होऊ  शकतो. 

खानदेशात प्रसिद्ध यात्रा 

खानदेशात सारंगखेडासह विखरण, शिरपूर, आमळी, बोरीस, तळोदा, शिंदे, मंदाणे, मुडावद, बहादरपूर, अमळनेर, धुळे, चोरवड, वायपूर आदी ठिकाणच्या यात्रा प्रसिद्ध आहेत. याशिवाय नवरात्र, चैत्र महिन्यात एकवीरादेवी, पेडकाईदेवी, मनुदेवी, बिजासनीदेवी, धनदाईदेवी, इंदाशीदेवी, धनाई पुनाई देवी, आशापुरीदेवी, भटाईदेवी आदी देवींच्या यात्रा ही प्रसिद्ध आहेत.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sankeshwar Banda Highway : संकेश्वर-बांदा महामार्गावरील शेकडो झाडांची कत्तल; पण लागवड कधी?

Sericulture Farming : रेशीम शेतीतून जणू महिन्याचा सक्षम पगार

Heat wave : झारखंड शिक्षण विभागाचा आदेश; उष्णतेच्या लाटेमुळे आजपासून ८ वी पर्यंतचे वर्ग बंद

Success Story : पाणी पुरवठा संस्थांद्वारे मांडकी झाले जलस्वयंपूर्ण

Kolhapur Kharip Crop : यंदा पाऊस चांगला! खरिपाच्या क्षेत्रात होणार वाढ, धुळवाफ पेरणीची तयारी

SCROLL FOR NEXT