दत्त कारखान्याच्या गळीत हंगामाची सांगता
दत्त कारखान्याच्या गळीत हंगामाची सांगता 
मुख्य बातम्या

दत्त कारखान्याच्या गळीत हंगामाची सांगता

टीम अॅग्रोवन

शिरोळ, जि. कोल्हापूर : येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या ऊस गळीत हंगामाची सोमवारी (ता. ८) सांगता झाली. कारखान्याने या हंगामात १२ लाख १२ हजार टन उसाचे गाळप करून १५ लाख १४ हजार ६०० साखर पोत्याचे उत्पादन केल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी दिली. कारखान्याचे दैनंदिन गाळप आठ हजारांहून अधिक टनाचे राहिले.

श्री. पाटील म्हणाले, ‘‘कारखान्याने या हंगामात पुरवठा केलेल्या उसासाठी प्रति टन २८७७ रुपये उपलब्ध केले आहेत. कारखान्याच्या वतीने देशात प्रथमच क्षारपड जमीन सुधारणा प्रकल्प हाती घेतला आहे. आतापर्यंत जवळजवळ पाच ते सहा हजार एकरांवर काम पूर्ण झाले आहे. या हंगामात कारखान्याने सहा हजार क्विंटल सेंद्रिय साखरेचे उत्पादन केले आहे. पुढील हंगामातील उसासाठी ५२२ एकर क्षेत्राची नोंद झालेली आहे कारखान्याचे कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील यांनी प्रास्ताविक केले.

रावसाहेब भोसले यांनी स्वागत केले. उपाध्यक्ष सिदगोंडा पाटील, अण्णासाहेब पाटील यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी ऊस विकास अधिकारी श्रीशैल हेगाना, ऊस विकास अधिकारी दिलीप जाधव, प्रोडक्शन मनेजर विश्वजीत शिंद, संजय संकपाळ आदीसह संचालक उपस्थित होते.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Rain : वादळी पावसाने टोमॅटो, मिरची, भेंडीसह ऊस पीक उद्धवस्त, नुकसान भरपाई मिळणार कधी?

Konkan Ranmeva : कोकणच्या रानमेव्यावर वातावरणाचा परिणाम, अनेकांचे आर्थिक गणित कोलमडणार

Agrowon Podcast : हळदीचे भाव तेजीतच; कापूस, सोयाबीन, गहू, लिंबू यांचे काय आहेत दर पाहुयात?

Ethanol Production : कांदा उत्पादकांच्या पाठोपाठ ऊस उत्पादकांनाही सरकारनं घोषणा करून भूलवलं ? | शेतीच्या बातम्या

Maharashtra Rain : राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा; देशातील अनेक भागात तापमानाचा पारा ४२ ते ४६ अंशाच्या दरम्यान

SCROLL FOR NEXT