सोलापूर  जिल्ह्यातील पंचनामे दोन दिवसांत पूर्ण करा : पालकमंत्री देशमुख
सोलापूर जिल्ह्यातील पंचनामे दोन दिवसांत पूर्ण करा : पालकमंत्री देशमुख 
मुख्य बातम्या

सोलापूर जिल्ह्यातील पंचनामे दोन दिवसांत पूर्ण करा : पालकमंत्री देशमुख

टीम अॅग्रोवन

सोलापूर : ‘‘पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे दोन दिवसांत पूर्ण करा’’, अशा सूचना पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी दिल्या.

पालकमंत्री देशमुख यांनी जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील वीट, कोर्टी, केत्तुर -१, पारेवाडी व कात्रज या भागांतील नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन, संबंधित शेतकऱ्यांकडून नुकसानीची माहिती घेतली. या वेळी आमदार संजय शिंदे, माजी आमदार जयंवतराव जगताप, तहसीलदार समीर माने, गटविकास अधिकारी श्रीकांत खरात आदींची प्रमुख उपस्थिती होती.

नुकसानीचे पंचनामे तत्काळ करून एकही शेतकरी शासनाच्या अनुदानापासून वंचित राहणार नाही, अशी दक्षता घेण्याच्या सूचना देशमुख यांनी तहसीलदार समीर माने यांना दिल्या. विविध ठिकाणी नुकसानग्रस्त पिकांची पाहाणी केली. तेथील शेतकऱ्यांबरोबर चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. शेतकऱ्यांनी नुकसान झालेल्या शेतीबाबतची आवश्यक कागदपत्रे कृषी सहायक, तलाठी आणि ग्रामसेवक यांच्याकडे द्यावेत, असे आवाहनही पालकमंत्री देशमुख यांनी केले. या वेळी विविध गावांतील शेतकऱ्यांकडून त्यानी निवेदने स्वीकारली.

मोहोळ तालुक्यातही मोठे नुकसान

पालकमंत्री देशमुख यांनी मोहोळ तालुक्यातील कामती (खुर्द) व कुरुल या भागांतील नुकसानग्रस्त पिकांचीही पाहणी केली. त्यांनी शेतकऱ्यांकडून नुकसानीची माहिती घेतली. या वेळी जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम विभागाचे सभापती विजयराज डोंगरे, जिल्हा परिषद सदस्या शैलजा गोडसे, उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती श्रीशैल नरोळे,  प्रांताधिकारी सचिन ढोले आदी उपस्थित होते. नुकसानीचे पंचनामे तत्काळ करावे, नुकसान झालेल्या पिकांची छायाचित्रे जिओ टॅगिंगसह काढून ठेवावी, अशा सूचना पालकमंत्र्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना दिल्या.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Book Review : ऋग्वेदाच्या पौराणिक अन् वैज्ञानिक स्पष्टीकरणाचा प्रयत्न

Drought Monitoring : दुष्काळ पाहणी पथकांचा सोपस्कार

Interview with Dashrath Tambale, Director of Atma : सेंद्रिय किंवा नैसर्गिक शेतीची सक्ती नाहीच...

Rural Story : जागरण

Sugarcane Management : खोडवा उसाचे व्यवस्थापन

SCROLL FOR NEXT