Complaint redressal mechanism required for crop insurance: Yashomati Thakur
Complaint redressal mechanism required for crop insurance: Yashomati Thakur 
मुख्य बातम्या

पीकविम्याबाबत हवी तक्रार निवारण यंत्रणा ः यशोमती ठाकूर

टीम अॅग्रोवन

अमरावती : पंतप्रधान पीकविमा योजनेतील निकषांतील त्रुटींमुळे शेतकऱ्यांना वेळेवर व योग्य परतावा मिळत नाही. त्यामुळे आवश्यक बदल व सुधारणा व्हावी जेणेकरून दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी बांधवांना विम्याचा लाभ मिळेल, अशी तक्रार निवारण यंत्रणा उभारावी अशी मागणी महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

केंद्र शासनाने पंतप्रधान पीकविमा योजना लागू केली. या योजनेत शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीच्या काळात पिकांना विम्याचे संरक्षण मिळावे व शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य लाभावे हा या योजनेचा उद्देश असल्याचे सांगण्यात आले. पंतप्रधान पीकविमा योजनेत केवळ विमा कंपन्यांना फायदा होत आहे. शेतकऱ्यांना होत नाही. पीकविमा योजनेंतर्गत परतावा शेतकऱ्यांना वेळेवर मिळत नाही, तसेच मिळाला तरी तो खूप उशिरा व अल्प प्रमाणात मिळतो. याबाबत केंद्र शासनाकडून तालुका व जिल्हा स्तरावर तक्रारी निवारणासाठी कोणतीही यंत्रणा नाही. पीक विम्याचा परतावा देण्यास कंपनी विलंब करत असेल तर कंपनीला दंड ठोठावण्याची तरतूद करण्यात आलेली नाही, असे ॲड. ठाकूर यांनी निवेदनात नमूद केले आहे. 

या योजनेत शेतकऱ्यांचे उत्पन्न निश्चित करण्याची पद्धत योग्य नाही. दुष्काळ किंवा अतिवृष्टीत शेतकऱ्यांना मदतीचा उद्देश सफल होताना दिसत नाही. या बाबत ॲड. ठाकूर यांनी मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री थोरात, कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकडे निवेदन दिले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Sowing : महाराष्ट्रात कापसाचा पेरा राहणार ४२ लाख हेक्टरवर

Animal Heat Stress : वाढत्या उष्म्याचा पशुधनाला धोका

Agriculture Technology : शेती तंत्रज्ञान, पिकांबाबत शेतकरी साक्षर असणे गरजेचे

Ocean Weather : हिंद महासागरात कायमस्वरूपी सागरी उष्ण लाटांची शक्यता

Bajari Harvesting : उन्हाळी बाजरी काढणीच्या अवस्थेत

SCROLL FOR NEXT