नाशिक बाजार समिती संचालकांवर गुन्हे दाखल होणार
नाशिक बाजार समिती संचालकांवर गुन्हे दाखल होणार 
मुख्य बातम्या

नाशिक बाजार समिती संचालकांवर गुन्हे दाखल होणार

टीम अॅग्रोवन

नाशिक : आचारसंहिता काळात शासकीय वाहनाचा वापर केल्याप्रकरणी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती संजय तुंगार, सचिव काळे यांच्यासह तीन संचालकांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी नाशिकच्या तहसीलदारांना दिले आहेत. या निर्णयामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. आचारसंहितेच्या काळात बाजार समितीच्या वाहनाचा वापर करण्यात आल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी त्याची दखल घेत गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाची सध्या अचारसंहिता लागू आहे. या आचारसंहितेच्या काळातच बाजार समितीचे उपसभापती संजय तुंगार यांनी समितीच्या एमएच १५ ईएक्स ३७९५ या वाहनातून पिंपळगावपर्यंत प्रवास केला. या वेळी बाजार समितीचे संचालक युवराज कोठुळे, दिलीप थेटे, रवींद्र भोये आदी होते. वाहन वापरताना या सर्वांनी कोणत्याही प्रकारची परवानगी घेतली नव्हती. पिंपळगाव बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात केलेल्या विविध विकासकामांना भेटी दिल्या होत्या. या प्रकाराची प्रशासनाने गंभीर दखल घेत चौकशी केली. यामध्ये बाजार समितीचे सचिव आणि वाहनचालकाचे जाबजबाब प्रशासनाने नोंदवून घेतले. तसेच संबंधित संचालकांकडून खुलासा मागविला होता.   संबंधित संचालकांनी दोनच दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांकडे त्यांचा खुलासा सादर केला. त्यात निवडणूक आयोगाचे कोणतेही पत्र मिळाले नसल्याचा दावा केला आहे. तसेच वाहन हे सचिवांच्या अधिपत्याखाली असून, त्याबाबतचे लॉगबुकही त्यांच्याकडेच असल्याचे नमूद केले आहे. तसेच चालकाने सचिवांच्या परवानगीशिवाय वाहनाचा उपयोग केल्याचेही खुलाशात नमूद केल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. आचारसंहितेचा भंग झाल्याचे उघड झाल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी उपसभापती तुंगार, संचालक युवराज कोठुळे, दिलीप थेटे, रवींद्र भोये यांच्यासह समितीचे सचिव काळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT