Compensate animals for ‘Lampi’ disease
Compensate animals for ‘Lampi’ disease 
मुख्य बातम्या

‘लंम्पी’ आजाराने दगावलेल्या जनावरांची भरपाई द्या

टीम अॅग्रोवन

यवतमाळ ः राज्यात जनावरांवर लंम्पी आजाराचा प्रादुर्भाव वाढीस लागला आहे. त्याच्या नियंत्रणासाठी तज्ज्ञांना अद्यापही लस विकसित करता आली नाही. त्यामुळे राज्यात आजवर जी जनावरे दगावली त्या पशुमालकांना भरपाई देण्यात यावी, अशी मागणी शेतकरी वारकरी संघटनेने केली आहे.

कृषिमंत्री दादा भुसे यांना या संदर्भाने निवेदन देण्यात आले. त्या निवेदनानुसार, राज्यात दोन लाखांपेक्षा अधिक जनावरे लंम्पी आजाराने बाधित झाली आहेत. यामध्ये जनावराच्या अंगावर गाठी येतात. वेळीच निदान आणि उपचार न मिळाल्यास जनावरे दगावतात. लंम्पी आजारामुळे राज्यात जनावरे दगावण्याचे प्रमाण १ ते ३ टक्के आहे. पशुसंवर्धन विभागाकडून पशुपालकांना मार्गदर्शनही केल्यात जात नाही. त्यामुळे पशुपालक काहीसे गोंधळलेले आहेत.

या पार्श्वभूमीवर शासनाने या आजाराचे योग्य निदान होईपर्यंत पशुपालकांमधील भीती घालविण्यासाठीच्या उपाययोजनांच्या प्रचार-प्रसाराकरिता पुढाकार घ्यावा. सध्या या आजाराच्या नियंत्रणासाठी लस देखील विकसित झालेली नाही. त्यामुळे जनावरांच्या मृत्यूचे प्रमाण देखील वाढते आहे. या पार्श्वभूमीवर ज्या पशुपालकांची जनावरे दगावली त्या पशुपालकांना शासनाकडून नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी,  शेतकरी वारकरी संघटनेचे अध्यक्ष सिकंदर शहा यांनी केली आहे.

लंम्पी बाधित जनावरांच्या मालकांना निःशुल्क औषधांचा पुरवठा करण्यात यावा. तसेच याबाबत पावसाळी अधिवेशन काळात शासन निर्णय काढण्यात यावा, असेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे. निवेदनकर्त्यांमध्ये बाळू चव्हाण, दीपक मडसे, विजय राठोड, जावेद अन्सारी, पिंटू बांगर, राजू नागरगोजे यांचा समावेश होता.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

SCROLL FOR NEXT