cold
cold  
मुख्य बातम्या

खानदेशात गारठा वाढला 

टीम अॅग्रोवन

पुणे ः उत्तर भारतातील काही राज्यात थंडीची लाट आली आहे. यामुळे खानदेशातील अनेक भागांत थंडी वाढली आहे. मध्य महाराष्ट्रातही किंचित थंडी असून कोकण, मराठवाडा व विदर्भात थंडी कमी झाली आहे. बुधवारी (ता. २०) सकाळी आठ वाजेपर्यंत जळगाव येथे नीचांकी ११.४ अंश सेल्सिअसची सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले. 

गेल्या दोन दिवसांपासून उत्तर प्रदेश ते उत्तर कोकण व उत्तर मध्य प्रदेश या दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र आहे. हे क्षेत्र समुद्रसपाटीपासून ९०० मीटर उंचीवर आहे. तसेच बंगाल उपसागराच्या नैर्ऋत्य भागात आणि हिंदी महासागराच्या परिसरात चक्रीय वाऱ्यासाठी समुद्रसपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर पोषक वातावरण तयार होत आहे. यामुळे राज्यातील काही भागांत अंशतः ढगाळ वातावरणाची स्थिती कायम आहे. कोकण, मराठवाडा व विदर्भातील अनेक भागांत थंडी कमी झाली झाली असून, किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत जवळपास सहा अंश सेल्सिअसपर्यंत वाढ झाली आहे. येत्या दोन ते तीन दिवसांनंतर राज्यात हवामान कोरडे राहील. त्यामुळे थंडीत किंचित वाढ होण्याची शक्यता आहे.  उत्तर भारतातील पंजाब, हरियाना, चंडीगड आणि पश्‍चिम राजस्थान या भागांत आज थंडीची अति तीव्र थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. यामुळे किमान तापमानात चांगलीच घट होण्याची शक्यता आहे. पश्‍चिम राजस्थानमधील पिलानी येथे ४.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले. तर राज्यात जळगावमध्ये सर्वांत कमी तापमान होते. निफाड, नाशिक, नगर भागांतही चांगलीच थंडी होती. कोकणात किमान तापमानाचा पारा १९ ते २१ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. मध्य महाराष्ट्र ११ ते २०, मराठवाड्यात १४ ते १८ आणि विदर्भात १६ ते १९ अंश सेल्सिअसच्या दरम्यान किमान तापमान होते.  बुधवारी (ता.२०) सकाळपर्यंत विविध शहरांतील किमान तापमान, कंसात वाढ, घट झालेले तापमान, अंश सेल्सिअसमध्ये ः 

  • मुंबई (सांताक्रूझ) १९ (२) 
  • रत्नागिरी २१.५ (२) 
  • डहाणू १९.३ (२) 
  • पुणे १६.१ (५) 
  • जळगाव ११.४ (-१) 
  • कोल्हापूर २० (५) 
  • महाबळेश्‍वर १५.४ (२) 
  • मालेगाव १८.२ (६) 
  • नाशिक १४.६ (४) 
  • सांगली १८.१ (४) 
  • सातारा १७.४ (४) 
  • सोलापूर १७.९ (२) 
  • औरंगाबाद १६.९ (५) 
  • बीड १८.८ (५) 
  • परभणी १८ (४) 
  • नांदेड १८ (४) 
  • उस्मानाबाद १६.६ (२) 
  • अकोला १८.६ (४) 
  • अमरावती १८.५ (४) 
  • बुलडाणा १७ (२) 
  • चंद्रपूर १६.८ (१) 
  • गोंदिया १६.८ (४) 
  • नागपूर १९.५ (६) 
  • वर्धा १८.६ (५) 
  • यवतमाळ १७ (२) 
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Rice Research : अधिक ‘बी१’ जीवनसत्त्व असलेला भात विकसित

    Waghad Project : ‘वाघाड’ने घडविला कायापालट

    Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात १०२ गावांना टँकरने पाणी सुरू

    Road Work Update : पाणंद रस्त्यांची ८५० हून अधिक कामे ठप्प

    Mathadi Worker Protest : माथाडी कामगारांचे सरणावर बसून आंदोलन

    SCROLL FOR NEXT