eggs
eggs  
मुख्य बातम्या

नागपूर : थंडीची तीव्रता वाढली; अंडी दरात सुधारणा नाही

Vinod Ingole

नागपूर ः थंडीच्या दिवसांत मागणी वाढत अंड्यांचे दरही वाढतात. या वर्षी मात्र पहिल्यांदाच थंडीची तीव्रता वाढली असली, तरी अंड्यांचे दर मात्र खाली आल्याने अंडी उत्पादक अडचणीत आले आहेत. शासनाने याविषयी हस्तक्षेप करण्याची मागणी पोल्ट्री व्यावसायिकांची असून, यासंदर्भाने लवकरच एक शिष्टमंडळ सत्ताधाऱ्यांना भेटणार आहे. राज्यात इतर ऋतूंऐवजी हिवाळ्यात अंड्यांना मागणी वाढते. त्यामुळेच दरातही तेजी येते, असा दरवर्षीचा पोल्ट्री उद्योगाचा अनुभव आहे. या वर्षी दरात तेजी येण्याऐवजी उत्पादकता खर्चाची भरपाईच अशक्‍य झाल्याने पोल्ट्री व्यावसायिक अडचणीत आले आहेत. शेकडा (१०० नगामागे) सरासरी ६० रुपयांची घसरण झाल्याचे सांगण्यात आले. थंडीपूर्वी राज्यात अंड्यांचे दर ५१९ रुपये शेकडा होते; ते आता ४६० रुपयांपर्यंत खाली आले आहेत. हैदराबाद मार्केटचे दर ४५५ वरून ४०५ पर्यंत खाली आले आहेत, असेही पोल्ट्री व्यावसायिक क्षेत्रातील सूत्रांनी सांगितले. राज्याची रोजची अंड्यांची मागणी २ कोटी नगांची आहे. यातील १ कोटी २० लाख अंड्यांचे उत्पादन महाराष्ट्रात होते. अंडी उत्पादनात सरासरी ८० लाखांचा वाटा पुणे जिल्ह्याचा आहे. दहा लाख अंडी उत्पादन विदर्भातील अमरावती जिल्ह्यात, तर दोन लाखांवर अंडी उत्पादन नागपूर जिल्ह्याचे आहे. हैदराबादवरून ५५ लाख अंडी येतात, तर कर्नाटक तसेच तमिळनाडूमधून १५ लाख अंडी येतात. याप्रमाणे बहुतांश गरज भागत असली, तरी काही प्रमाणात तुटवडा भासतो, असेही सांगण्यात आले. दरवर्षी थंडीच्या दिवसांत दर वधारत १०० नगांसाठी ५०० रुपयांपर्यंत ते पोचतात. या वेळी खरेदीदारांकडून उठाव नसल्याने दर ४६० व त्यापेक्षाही खाली आले आहेत. १०० अंड्यांचा उत्पादन खर्च ४३० रुपये आहे. दरातील घसरणीपायी उत्पादकता खर्चाची भरपाईदेखील शक्‍य होत नसल्याचे पोल्ट्री व्यावसायिकांनी सांगितले. त्यातच पोल्ट्री खाद्याच्या दरातील तेजीचाही उत्पन्नावर परिणाम झाला आहे. प्रतिक्रिया सोयाबीन ढेप ३८ हजार रुपये टन असून, त्यावर ५ टक्‍के जीएसटी आकारली जाते. मका २० रुपये किलो, ब्रोकन राइस १८८ रुपये किलो, सूर्यफूल ढेप २५ रुपये किलो, तांदूळ कोंडा १६ रुपये किलो आणि वाहतूक खर्च अशाप्रकारे पोल्ट्री खाद्य महागले आहे. त्यातच अंड्यांच्या दरात झालेली घसरण पाहता उत्पादकता खर्चाचीदेखील भरपाई होत नाही. - रवींद्र मेटकर, पोल्ट्री व्यावसायिक, अमरावती

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Production : सांगलीत साखर उत्पादनात सात लाख क्विंटलने वाढ

MahaRally Meeting : धुळ्यात महारॅलीची प्रशासनाकडून जय्यत तयारी

Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

Kharif Sowing : साडेसात लाख हेक्टरवर जिल्ह्यात खरिपाचा पेरा

Shaktipeeth mahamarg : 'रस्त्यांवरच्या लढाईची शेतकऱ्यांनी तयारी करावी', शक्तिपीठ विरोधात शेतकऱ्यांची एकजूठ

SCROLL FOR NEXT