राज्यात दिवसही ठरताहेत थंड
राज्यात दिवसही ठरताहेत थंड 
मुख्य बातम्या

राज्यात दिवसही ठरताहेत थंड

Amol kutte

पुणे : उत्तरेकडील शीत लहरींनी राज्यावर स्वारी केल्याने राज्यात थंडीची तीव्र लाट आली आहे. रात्रीच्या तापमानात मोठी घट झाल्याने हुडहुडी वाढली आहे, तर दिवसाचे तापमान घसरून दुपारही गारठा असल्याने दिवस थंड ठरत आहेत. बुधवारी (ता. ३०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भातील गोंदिया येथे दिवस सर्वाधिक थंड ठरला. दिवसाचे तापमान सरासरीपेक्षा ७.३ अंशाने घसरून गोंदियात राज्यातील नीचांकी २२ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.  वाऱ्याच्या दिशेत झालेले बदल, आर्द्रता आणि ढगाळ हवामान यामुळे राज्यात थंड दिवस अनुभवायला मिळत आहेत. हवामान विभागाच्या परिमाणानुसार रात्रीचे (किमान) तापमान १० अंशांपेक्षा कमी असेल आणि दिवसाच्या (कमाल) तापमानात सरासरीपेक्षा ४.५ ते ६.४ अंशांपर्यंत घट झाली असेल तर तो दिवस ‘थंड दिवस’ समजण्यात येतो.   तसेच कमाल तापमानात ६.५ अंशांपेक्षा अधिक घट झाली असेल तर तो दिवस ‘अतिथंड दिवस’ ठरतो. गोंदियासह बुलडाणा येथेही राज्यातील दिवसाचे नीचांकी २२ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. या ठिकाणी कमाल तापमानात तब्बल ६.४ अंशांची नोंद झाली. बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भातील अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ, मध्य महाराष्ट्रातील मालेगाव, नाशिक, औरंगाबाद, परभणी येथे थंड दिवस होता. पुढील दोन दिवस मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये, तर आज (ता. ३१) विदर्भात दिवस थंड राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. राज्यातील थंड दिवस असलेली ठिकाणे : कंसात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत झालेली घट : बुलडाणा २२.० (- ६.४)  गोंदिया २२.० (-७.३)  अकोला २६.० (-५.१)  अमरावती २५.४ (- ५.४)  नागपूर २५.२ (- ४.९)   वर्धा २५.० (-५.०)   यवतमाळ २५.० (- ५.२)   मालेगाव २४.८ (- ६.४)  नाशिक २५.३ (- ४.९)  औरंगाबाद २५.४ (- ४.९)  परभणी २७.० (- ४.४).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT