मका खरेदी
मका खरेदी 
मुख्य बातम्या

बुलडाणा जिल्ह्यात भरडधान्य खरेदी केंद्रे सुरू

टीम अॅग्रोवन
बुलडाणा   ः खरीप हंगामातील ज्वारी, बाजरी, मका या भरडधान्य खरेदीकरिता किमान आधारभूत खरेदी किंमत योजनेअंतर्गत खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. हे केंद्र प्रत्येक तालुका मुख्यालयी राहणार असून, तालुका खरेदी-विक्री संघाला खरेदी अभिकर्ता म्हणून मान्यता देण्यात आली आहे.
 
या केंद्रावर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेली एफएक्यू ज्वारी (संकरित) १७०० रुपये व एफएक्यू ज्वारी (मालदांडी) १७२५ रुपये, बाजरी १४२५ रुपये आणि मका १४२५ रुपये प्रतिक्विंटल या दराप्रमाणे खरेदी करण्यात येणार आहे. 
 
जिल्ह्यात बाजार समितीच्या कार्यक्षेत्रामध्ये शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या धान्याची खरेदी-विक्री मंजूर आधारभूत किमतीपेक्षा कमी दराने करण्यात येऊ नये. किमान आधारभूत दरापेक्षा कमी दराने धान्य खरेदी होत असल्याचे आढळल्यास त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी नियम ३२ अन्वये निर्धारित नियमानुसार कारवाई करण्यात येईल. तरी शेतकऱ्यांनी आधारभूत किंमत खरेदी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांनी केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Production : सांगलीत साखर उत्पादनात सात लाख क्विंटलने वाढ

MahaRally Meeting : धुळ्यात महारॅलीची प्रशासनाकडून जय्यत तयारी

Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

Kharif Sowing : साडेसात लाख हेक्टरवर जिल्ह्यात खरिपाचा पेरा

Shaktipeeth mahamarg : 'रस्त्यांवरच्या लढाईची शेतकऱ्यांनी तयारी करावी', शक्तिपीठ विरोधात शेतकऱ्यांची एकजूठ

SCROLL FOR NEXT