मुख्यमंत्र्यांनी रद्द केली शासकीय महापूजा
मुख्यमंत्र्यांनी रद्द केली शासकीय महापूजा 
मुख्य बातम्या

शासकीय महापूजेला मुख्यमंत्री जाणार नाहीत

सकाळ वृत्तसेवा

पुणे - आषाढी एकादशीच्या दिवशी मुख्यमंत्र्यांना शासकीय महापुजेपासून रोखण्यासाठी आंदोलन करण्याच्या मराठा संघटनांच्या पवित्र्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूरला शासकीय महापुजेसाठी न जाण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनीही मंगळवेढा येथे ही माहिती दिली.

मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी मराठा संघटनांकडून राज्यात विविध ठिकाणी आंदोलने सुरु आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, याचा निषेध करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना शासकीय महापुजेला जाण्यापासून रोखण्याचा निर्णय मराठा संघटनांनी घेतला होता. आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपुरात लाखो वारकरी श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी येतात. त्यांना आंदोलनामुळे त्रास होऊ नये व तेथिल सलोखा बिघडू नये, यासाठी शासकीय महापुजेला न जाण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे.

राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पंढरपुरातल्या शासकीय महापुजेला न जाण्याचा प्रसंग 1996 नंतर पहिल्यांदा घडतो आहे. 1996 मध्ये तत्कालिन मुख्यमंत्री मनोहर जोशी शासकीय महापुजेसाठी गेले नव्हते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Rain : वादळी पावसाने टोमॅटो, मिरची, भेंडीसह ऊस पीक उद्धवस्त, नुकसान भरपाई मिळणार कधी?

Konkan Ranmeva : कोकणच्या रानमेव्यावर वातावरणाचा परिणाम, अनेकांचे आर्थिक गणित कोलमडणार

Agrowon Podcast : हळदीचे भाव तेजीतच; कापूस, सोयाबीन, गहू, लिंबू यांचे काय आहेत दर पाहुयात?

Ethanol Production : कांदा उत्पादकांच्या पाठोपाठ ऊस उत्पादकांनाही सरकारनं घोषणा करून भूलवलं ? | शेतीच्या बातम्या

Maharashtra Rain : राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा; देशातील अनेक भागात तापमानाचा पारा ४२ ते ४६ अंशाच्या दरम्यान

SCROLL FOR NEXT