ढगाळ वातावरणाचा द्राक्ष खरेदीवर परिणाम
ढगाळ वातावरणाचा द्राक्ष खरेदीवर परिणाम 
मुख्य बातम्या

ढगाळ वातावरणाचा द्राक्ष खरेदीवर परिणाम

सकाळ वृत्तसेवा

पांगरी, जि. सोलापूर : गेल्या दोन दिवसांपासून निर्माण झालेल्या ढगाळ वातावरणामुळे पांगरी पंचक्रोशीतील द्राक्ष खरेदीवर परिणाम झाला आहे. द्राक्षे हंगामास नुकतीच सुरवात झाली. मात्र व्यापाऱ्यांनी माल खरेदी करण्यासाठी हात आखडता घेतला आहे. त्यामुळे हाताशी आलेला घास हिरावण्याच्या भितीने द्राक्षे बागायतदारामध्ये चिंतेचे वातावरण आहे. परिणामी, द्राक्षे बागेस संरक्षित विमा देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे.  

व्यापाऱ्यांनी खरेदी केलेल्या द्राक्षे बागेतील माल सलग उचलला जात नाही. तीन दिवसांत संपणाऱ्या द्राक्षमालास व्यापारी वर्गाकडून पंधरा दिवसांचा कालवधी लावतात. त्यामुळे द्राक्षे हंगाम लांबणीवर जात असल्याची स्थिती आहे. सध्या द्राक्षे खरेदीसाठी वाशीम, नांदेड, निजामाबाद, पुसद, यवतमाळ, नागपूर, विजयवाडा आदी ठिकाणाचे व्यापारी येत आहेत. विक्रीसाठी तयार झालेल्या बागेमध्ये जाऊन माल घेण्यामध्ये सध्या चढाओढ दिसून येत नाही. ढगाळ वातावरण नाहीसे झाल्यानंतर मात्र द्राक्षे हंगामास वेग येणार आहे. 

सध्या माणिकचमनला ३० ते ४०, सुपर सोनाकाला ३५ ते ४०, साधी सोनाकाला ३५ ते ४० रुपयांपर्यंतचा दर मिळत आहे. नव्या वाणाची लागवड झाली. परंतु या भागात मालावर बागा नसल्याने दर निश्चित नाहीत. द्राक्षांमध्ये नवनवीन जातीचे वाण येत आहेत.  

विमा कंपन्या जवळपास सर्वच पिकांचा विमा शेतकऱ्यांकडून भरून घेतात. मात्र द्राक्षे हे अत्यंत नाजूक पीक आहे. ते वातावरणातील बदलास तत्काळ बळी पडते. आजपर्यंत द्राक्षे बागेसाठी पीकविम्याची संरक्षित रक्कम मिळू शकली नाही. कारण शासनाने ठरवून दिलेल्या निकषात शेतकरी बसत नसल्याची स्थिती आहे. 

द्राक्ष हंगाम मेअखेरपर्यंत करा

द्राक्षे हंगाम जानेवारीअखेरपर्यंत धरला जातो. परंतु या भागातील हंगाम जानेवारीनंतर चालू होतो. याच कालवधीत दरवर्षी अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे द्राक्षांचे नुकसान होते. हा हंगाम मेअखेरपर्यंत सुरू असतो. त्यामुळे शासनाने द्राक्षे विमा निकषात बदल करून कालावधी मेपर्यंत वाढवावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage : एप्रिलमध्ये पिकांचे २७ कोटींचे नुकसान

Agriculture Irrigation : आक्रोश मोर्चाचे रूपांतर उपोषणात

Cotton Cultivation : सरासरीच्या तुलनेत यंदा कपाशीची लागवड वाढणार

Book Review : ऋग्वेदाच्या पौराणिक अन् वैज्ञानिक स्पष्टीकरणाचा प्रयत्न

Drought Monitoring : दुष्काळ पाहणी पथकांचा सोपस्कार

SCROLL FOR NEXT