Climate change adversely affects crop production
Climate change adversely affects crop production 
मुख्य बातम्या

हवामान बदलांचा उत्पादनावर प्रतिकूल परिणाम

टीम अॅग्रोवन

नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांमध्ये एकीकडे लवकर पेरणी केलेल्या ज्वारी, गहू, हरभरा या पिकांची सुगी सुरू आहे. तर दुसरीकडे उशिरा पेरणी केलेली पिके परिपक्वतेच्या अवस्थेत आहेत. यंदाच्या रब्बी हंगामातील पिकांवर हवामानातील बदलांचा प्रतिकूल परिणाम झाला आहे.

कीड, रोगांच्या प्रादुर्भावामुळे ज्वारी, गहू, हरभरा या प्रमुख पिकांचे नुकसान झाले आहे. सद्यःस्थितीत या तीन जिल्ह्यांतील उशिरा पेरणी केलेल्या हरभरा पिकांवर तांबेराचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

आॅक्टोबर-नोव्हेंबर महिन्यापर्यंत पाऊस सुरू राहिल्याने रब्बीच्या पेरण्या वेळेवर होऊ शकल्या नाहीत. अनेक भागात जानेवारी महिन्यापर्यंत पेरणी सुरू राहिली. वाढीच्या, परिपक्वतेच्या अवस्थेत ढगाळ वातावरण, अधूनमधून पाऊस सुरू राहिला. तापमानातील वाढ आदींमुळे किडी तसेच बुरशीजन्य रोगांसाठी पोषक वातावरण राहिले. 

हवामानात होत असलेल्या अचानक बदलामुळे सुरुवातीला पेरणी केलेल्या ज्वारीवर मावा या रसशोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव झाला. चिकटा पडला. काळ्या बुरशीची वाढ होऊन पाने अकाली वाळून गेली. परिपक्व होण्याच्या अवस्थेत पाने वाळल्याने कणसात दाणे भरली नाहीत. परिणामी धान्य उत्पादनात घट येत आहे. 

यंदा, हवामान बदलांमुळे कीड, रोगांसाठी पोषक वातावरण राहिले. हरभऱ्यावरील तांबेरा युरोमायसिज सिसरी-आर्यन्ती या बुरशीमुळे होतो. हदगाव (ता. नांदेड) सह जिल्ह्यातही हा रोग घाटे भरणे काळात आल्यामुळे उत्पादनात घट येणार आहे. - डॉ. कल्याण आपेट, वनस्पती विकृतीशास्त्र विभाग, वनामकृवि, परभणी

हरभऱ्याचे घाटे भरण्याच्या अवस्थेत बुरशीजन्य रोग पडला. त्यामुळे पीक अकाली वाळून गेल्याने उत्पादनात घट येणार आहे.  - प्रल्हादराव बरसाले, डिग्रस बुद्रुक, ता. सेलू, जि. परभणी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Production : सांगलीत साखर उत्पादनात सात लाख क्विंटलने वाढ

MahaRally Meeting : धुळ्यात महारॅलीची प्रशासनाकडून जय्यत तयारी

Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

Kharif Sowing : साडेसात लाख हेक्टरवर जिल्ह्यात खरिपाचा पेरा

Shaktipeeth mahamarg : 'रस्त्यांवरच्या लढाईची शेतकऱ्यांनी तयारी करावी', शक्तिपीठ विरोधात शेतकऱ्यांची एकजूठ

SCROLL FOR NEXT