शेत जमिनीच्या मोजणीसाठी चार हजार मागणारा लिपिक अटकेत
शेत जमिनीच्या मोजणीसाठी चार हजार मागणारा लिपिक अटकेत 
मुख्य बातम्या

शेत जमिनीच्या मोजणीसाठी चार हजार मागणारा लिपिक अटकेत

टीम अॅग्रोवन

सोलापूर ः पती-पत्नीच्या नावावर असलेल्या शेतजमिनीची मोजणी करून मोजणीचा अहवाल वरिष्ठांकडे पाठवण्यासाठी दहा हजार रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या मोहोळ येथील भूमिअभिलेख विभागातील लिपिकाला पहिला हप्ता म्हणून चार हजार रुपये स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी (ता.११) अटक केली. अकबर हनिफ शेख असे त्या लिपिकाचे नाव आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक राजेश बनसोडे, अप्पर पोलिस अधीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक संजीव पाटील, पोलिस निरीक्षक जगदीश भोपळे, हवालदार चंद्रकांत पवार, पोलिस कॉन्स्टेबल प्रमोद पकाले, श्‍याम सुरवसे यांच्या पथकाने मंगळवारी दुपारी भूमिअभिलेख कार्यालयात सापळा लावला. त्यामध्ये तक्रारदाराकडून शेख हा चार हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडला गेला.  तक्रारदाराच्या आई-वडिलांच्या नावे मोहोळ तालुक्यात शेतजमीन आहे. त्या शेतजमिनीची मोजणी करण्यासाठी तक्रारदाराने रीतसर भूमिअभिलेख कार्यालयाकडे अर्ज केला होता. त्यानुसार जमिनीची मोजणी करून दोन्ही गटांचा अहवाल वरिष्ठांकडे पाठवण्यासाठी १० हजार रुपयांची मागणी भूमिअभिलेख कार्यालयातील प्रतिलिपी लिपिक अकबर हनिफ शेख याने तक्रारदाराकडे केली. तक्रारदाराने यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सोलापूर यांच्याशी संपर्क करत याबाबत तक्रार नोंदवली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सदरच्या तक्रारीची पडताळणी केली. तसेच सापळा लावून पहिला हप्ता म्हणून चार हजार रुपये घेताना रंगेहात पकडले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Banana Farmer Issue : मेगारिचार्ज योजनेसह केळीचे प्रश्‍न प्रलंबित

Water Scarcity : पाण्याच्या आशेने करमाळ्यात विहिरींची खोदाई

Sharad Joshi : शरद जोशींचा अंगारमळा लवकरच इतिहास जमा होईल...

Kharif Season : खते, बी-बियाणे वेळेत उपलब्ध करा

Crop Insurance : केळी विमाधारक वादळात नुकसानीच्या परताव्यांपासून वंचित

SCROLL FOR NEXT