Children allergic to cow's milk smaller and lighter
Children allergic to cow's milk smaller and lighter 
मुख्य बातम्या

दुधाची ॲलर्जी असलेल्या मुलांची वाढ का खुंटते ?

वृत्तसेवा

ज्या मुलांना गाईच्या दुधाची ॲलर्जी असते, ती मुले त्यांच्या समवयस्कांपेक्षा आकाराने लहान राहण्यासोबतच वजनही कमी राहत असल्याचे अभ्यासामध्ये आढळले आहे. लहाणपणापासून पौगंडावस्थेपर्यंतच्या मुलांमधील दीर्घकालीन अन्न अॅलर्जीचा वाढीवरील होणारा परिणाम त्यामध्ये तपासण्यात आला.

  • हे संशोधन दी जर्नल ऑफ ॲलर्जी ॲण्ड क्लिनिकल इम्युनोलॉजीमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.   
  • मुलांमध्ये विविध खाद्यपदार्थांच्या अॅलर्जी दिसून येतात. त्याची त्वरित लक्षणे दिसत असली तरी वाढीवर होणारे परिणाम नेमकेपणाने मोजण्यात आले नव्हते.  
  • मुलांच्या राष्ट्रीय रुग्णालयातील अॅलर्जी, प्रतिकारकता विभागातील संशोधक कॅरेन ए. रॉबिन्स यांनी या विषयावर काम केले. त्यासाठी या विषयावर आजवर झालेल्या संशोधनाचा आढावा घेण्यात आला. त्याविषयी माहिती देताना डॉ. रॉबिन्स म्हणाले, की ॲलर्जीमुळे मुलांच्या उंची, वजन आणि वाढीवर होणारा परिणाम आजवर तितक्या स्पष्टपणे नोंदवण्यात आला नाही.  
  • विशेषतः त्यांची प्रौढपणीची उंची आणि वजन यांची सांगड घालण्यात आली नव्हती. मात्र, आमच्या अभ्यासातून ज्या मुलांना गाईंच्या दुधाची दीर्घकालीन ॲलर्जी होती, ती मुले त्यांच्या क्षमतेइतकी वाढू शकली नाहीत.   
  • असा झाला अभ्यास

  • अभ्यासामध्ये ॲलर्जी असलेल्या लहान मुलांचा त्यांच्या गाईचे दूध, शेंगदाणे किंवा अन्य पदार्थानुसार आणि त्याच्या लक्षणानुसार तक्ता बनवण्यात आला. त्यामध्ये पदार्थनिहाय इम्युनोग्लोब्युलीनची पातळी, त्वचेच्या चाचण्या आणि ज्या पदार्थांमुळे हे आव्हान उभे राहते, त्यांची यादी यांचा समावेश करण्यात आला.  
  • या मुलांचे वय दोन ते बारा वर्षे असताना नियमित रुग्णालयांना भेट होऊन नोंदी होतील, याची तजवीज केली. या प्रत्येक भेटीमध्ये मुलांची उंची, वजन यांची नोंद ठेवण्यात आली.  
  • नोव्हेंबर १९९४ ते मार्च २०१५ या काळामध्ये १९१ मुलांच्या नोंदी ठेवण्यात आल्या. त्यातील गायींच्या दुधाची ॲलर्जी असलेल्या आणि संपूर्णपणे दूध टाळणाऱ्या मुलांची संख्या १११ होती, तर शेंगदाण्यांची ॲलर्जी असलेल्यांची संख्या ८० होती. या मुलांच्या रुग्णालयाला एकूण ११८६ भेटी झाल्या.  
  • ॲलर्जी असलेल्या मुलांची संख्या ही मुलींपेक्षा अधिक होती. दुधाची ॲलर्जी असलेल्यांमध्ये ६१ टक्के मुले होती, तर शेंगदाणे किंवा सुका मेव्याची ॲलर्जी असलेली ५१.३ टक्के मुले होती.   
  •  गाईंच्या दुधाची ॲलर्जी असलेल्या मुलांची उंची कमी राहिली. त्यामध्येही ५ ते ८ आणि ९ ते १२ या वयोगटामध्ये उंचीतील फरक अधिक होता. आणि १३ वर्षावरील ५३ मुलांची नोंद घेण्यात आली. त्यामध्ये उंची आणि वजनातील फरक अधिक लक्षणीय असल्याचे दिसून आले.    
  • ज्या मुलांमध्ये एकापेक्षा अधिक पदार्थांच्या ॲलर्जी उदा. अस्थमा इ. होत्या, अशा मुलांचा व पालकांचा सरळ दूध टाळण्याकडे कल असतो. त्याच प्रमाणे अन्य काही पदार्थही टाळावे लागतात. त्याचाही या अभ्यासामध्ये परिणाम झालेला असू शकतो, असे डॉ. रॉबिन्स यांनी सांगितले.   
  • सध्या अशा अॅलर्जिक मुलांसाठी गाईंच्या दुधाचा अंतर्भाव असलेले बेकरी पदार्थ उपलब्ध होत आहेत. त्यातून मुलांच्या पोषकतेची समस्या काही अंशी तरी मार्गी लागू शकते. अर्थात, अधिक अभ्यासाची आवश्यकता असल्याचे मत रॉबिन्स व्यक्त करतात.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

    Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

    Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

    Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

    Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

    SCROLL FOR NEXT