श्रीधर ठाकरे
श्रीधर ठाकरे 
मुख्य बातम्या

मराठा आरक्षणासाठी आता लढा नाही, जल्लोष करायचा ः देवेंद्र फडणवीस

टीम अॅग्रोवन

नगर : मराठा समाजाने आरक्षणासाठी अनेक वर्षांपासून आंदोलने केली. आता अरक्षणाचा मार्ग मोकळा झाला असून, मागासवर्ग आयोगानेही अहवाल सादर केला आहे. येत्या पंधरा दिवसांत मराठा समाजाला आरक्षण देण्याचा विषय मार्गी लागेल. आता लढा नाही जल्लोष करायचा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (ता. १५) केले.   

शेतकरी मराठा महासंघ व अखिल भारतीय मराठा महासंघाच्या नगर शाखेतर्फे शनिशिंगणापूर (ता. नेवासे, जि. नगर) येथे गुरुवारी शेतकरी वारकरी महासंमेलनाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झाले. अध्यक्षस्थानी राष्ट्रसंत बद्रीनाथ महाराज तनपुरे होते.  महसूलमंत्री चंद्रकांत दादा पाटील, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, जलसंधारणमंत्री तथा पालकमंत्री प्रा. राम शिंदे, संमेलनाचे आयोजक व शेतकरी-मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष संभाजी दहातोंडे पाटील, खासदार दिलीप गांधी, आमदार शिवाजी कर्डिले, स्नेहलता कोल्हे, मोनिका राजळे, भाऊसाहेब कांबळे, बाळासाहेब मुरकुटे, सुजितसिंह ठाकूर, चंद्रशेखर कदम, माजीमंत्री बबनराव पाचपुते, माजी आमदार शंकरराव गडाख, चंद्रशेखर घुले, यांची उपस्थिती होती. 

प्रारंभी संभाजी दहातोंडे यांनी प्रास्ताविक करून शेतकरीआत्महत्या  थाबण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याचे सांगितले.  पुरस्काराने गौरव शेतकरी मराठा महासंघ व अखिल भारतीय मराठा महासंघाच्या नगर शाखेतर्फे दरवर्षी समाजात चांगले काम करणाऱ्या व्यक्तींचा गौरव केला जातो. यंदा शनिशिंगणापूर (ता. नेवासे, जि. नगर) येथे झालेल्या शेतकरी वारकरी महासंमेलनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते खासदार सी. आर. पाटील, डॉ. रंजना बेल्हेकर, समाजभूषण कृषी पुरस्कार श्रीधर ठाकरे, (स्व.) बाबूराव बानकर, तर समाजभूषण पुरस्कार नारायणराव डौले यांना देऊन गौरव करण्यात आला. पुरस्कार स्वरूप पुढील वर्षापासून वाढ केली जाणार असल्याचे या वेळी संभाजी दहातोंडे यांनी सांगितले.  प्रसंगी कर्ज घेऊ राज्यात काही भागांत दुष्काळाचे संकट असले तरी गेल्या चार वर्षांपासून जलसंधारणाच्या केलेल्या कामामुळे राज्याला फायदा झाला आहे. भविष्यात शेतकऱ्यांसाठी कर्ज घेण्याची वेळ आली तरी घेऊ, पण शेती आणि शेतकऱ्यांसाठी काम सुरूच राहील. गेल्या चार वर्षांत सरकारने शेती आणि शेतकरी समोर ठेवूनच काम केले आहे, असे  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Guava Farming : जत तालुक्यात पेरूचे ‘कल्चर’

Natural Disaster in Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरवर निसर्ग कोपला; अतिवृष्टी, भूस्खलनानंतर भूकंपाचे धक्के

Kadavanchi Watershed Project : कडवंची ‘वॉटर बजेट’द्वारे समृद्धी

Sangli Currant Farmers : सांगली, तासगाव येथील बेदाणा सौदे चार दिवस बंद, शेतकरी अडचणीत

Sand Mining : वाळू उपसून तर बघा...

SCROLL FOR NEXT