हरभऱ्‍याचा उतारा यंदा घसरला, एकरी ३ ते ४ क्विंटल उत्पादन Harbhajan's transcript dropped this year, Yield 3 to 4 quintals per acre
हरभऱ्‍याचा उतारा यंदा घसरला, एकरी ३ ते ४ क्विंटल उत्पादन Harbhajan's transcript dropped this year, Yield 3 to 4 quintals per acre 
मुख्य बातम्या

हरभऱ्‍याचा उतारा यंदा घसरला, एकरी ३ ते ४ क्विंटल उत्पादन

टीम अॅग्रोवन

सुलतानपूर, जि. बुलडाणा : यंदाच्या हंगामात चांगला पाऊस झाल्याने रब्बीत हरभऱ्याचा पेरा मोठ्या प्रमाणात वाढला होता. सध्या हरभऱ्याची सोंगणी सुरू झाली असून,  गतवर्षीपेक्षा सोंगणीचा दर वाढल्याने शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. लोणार तालुक्यातील ग्रामीण भागात हरभरा सोंगणीचा दर प्रती एकर दोन हजार रुपयांवर पोचला आहे, तर दुसरीकडे उत्पादन एकरी तीन ते चार क्विंटल दरम्यान होत आहे. 

यंदा सततचा पाऊस व परतीच्या पावसाने खरीप हंगामातील सर्वच पिकांची नासाडी झाल्याने शेतकऱ्यांच्या हातातून हंगाम गेला होता. ही आर्थिक उणीव रब्बीतून वसूल होईल, या हेतूने शेतकऱ्यांनी पैशांची जुळवाजुळव करून पेरणी केली. परिसरात हरभऱ्याला पसंती देण्यात आली होती.

सध्या हरभरा सोंगणी सुरू झाली आहे. हरभरा सोंगणीचा दर वाढल्याने शेतकऱ्यांना खर्च जड जात आहे. हरभऱ्याचे पीक शेतात बहरलेले असताना चांगले उत्पादन होईल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र ऐन फूल धारणेच्या वेळी ढगाळ वातावरण व पहाटेच्या सुमारास पडलेल्या धुक्यामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सध्या परिसरात हरभऱ्याचे प्रती एकर ३ ते ४ क्विंटलच उत्पादन होत असल्याचे चित्र आहे.

प्रतिक्रिया.. ढगाळ वातावरणामुळे सुलतानपूर परिसरातील हरभऱ्याचे नुकसान झाले. उत्पादनात मोठी घट आली आहे. मजुरी महागल्याने शेतकरी दुहेरी आर्थिक संकटात सापडला आहे. -नारायण पिसे, शेतकरी, शिवणीपिसा, ता. लोणार. जि. बुलडाणा.

 हरभरा सोंगणी दर :

  • सरासरी दोन हजार रुपये एकर
  •  हरभरा काढणी : २०० रुपये पोते
  •  उत्पादन :३ ते ४ क्विंटल
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Animal Care : वाढत्या तापमानात जनावरांचे व्यवस्थापन

    Lok Sabha Elections : चुरशीने मतदान; सकाळी ९ पर्यंत कोल्हापूर ८.०४ टक्के तर हातकणंगले ७.५५ टक्के मतदानाची नोंद

    Fish Farming : पुनर्वसनग्रस्ताला मिळाला मत्सशेतीतून मोठा आधार

    Turmeric Farming : हळदीची वाढली उत्पादकता

    Farmer As Life Partner : आदर्शवत विवाहसोहळा

    SCROLL FOR NEXT