धार्मिक स्थळांनी द्यावा दुष्काळासाठी निधी : धर्मदाय आयुक्‍त
धार्मिक स्थळांनी द्यावा दुष्काळासाठी निधी : धर्मदाय आयुक्‍त 
मुख्य बातम्या

धार्मिक स्थळांनी द्यावा दुष्काळासाठी निधी : धर्मदाय आयुक्‍त

टीम अॅग्रोवन

नागपूर ः राज्यातील सर्वधर्मीय धार्मिक स्थळांनी त्यांच्याकडील निधीचा उपयोग दुष्काळात होरपळणाऱ्या जनतेसाठी करावा, असे निर्देश धर्मदाय आयुक्‍त शिवकुमार डिगे यांनी दिले आहेत. त्यासंबंधी परिपत्रकच धर्मदाय विभागाकडून काढण्यात आले आहे.  राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये या वर्षी दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. राज्य सरकारकडून दुष्काळी उपाययोजनांची अंमलबजावणीदेखील त्या-त्या स्तरावर होत आहे. धार्मिक स्थळांनीदेखील दुष्काळात होरपळणाऱ्या जनतेला दिलासा देण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन धर्मदाय आयुक्‍त शिवकुमार डिगे यांनी केले आहे. त्या संबंधीचे परिपत्रकही धर्मदाय विभागाने काढले आहे. सर्वधर्मीय धार्मिक स्थळांच्या माध्यमातून त्यांच्या परिसरात दुष्काळ जाहीर झालेल्या गावांमध्ये चारा छावण्या उभाराव्यात, त्यासोबतच अन्नछत्रदेखील लावण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ज्या जिल्ह्यात किंवा महसुली मंडळांत दुष्काळ जाहीर झाला नसेल, अशा भागातील धार्मिक स्थळांच्या पदाधिकाऱ्यांनी दुष्काळी भागात अन्नछत्र आणि चारा छावण्या उभारण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.  धार्मिक स्थळांकडून या आदेशाची पूर्तता होते किंवा नाही या संदर्भाने स्थानिक स्तरावर धर्मदाय आयुक्‍त कार्यालयाचे नियंत्रण राहील, असेही परिपत्रकात म्हटले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maize Production : उत्पादनवाढीसाठी ‘गेमा’ची मका वाढवा मोहीम

Government Contractor Movement : सर्व विभागांतील कंत्राटदारांचे ७ मेपासून काम बंद आंदोलन

Loksabha Election : निवडणुकीच्या पाहणीसाठी २३ देशांचे ७५ अभ्यासक दाखल

Tur Market : दरात तेजीच्या अपेक्षेने तूर उत्पादकांनी विक्री रोखली

Weather Update : कोकणात उष्ण, दमट हवामानाचा येलो अलर्ट

SCROLL FOR NEXT