संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

‘एसएनएफ’ निकष बदलामुळे शेतकऱ्यांची पिळवणूक शक्य

टीम अॅग्रोवन

पुणे  : केंद्र शासनाने लागू केलेल्या गाय दुधाच्या निकषाचा विचार करता ८.३ टक्के ‘एसएनएफ’ आणि ३.२ टक्के फॅटसाठी शेतकऱ्यांना प्रतिलिटर आता केवळ २२.१० पैसे दर मिळणार आहे. मात्र ‘एसएनएफ’चे निकष ठरविताना पुन्हा शेतकऱ्यांच्या पिळवणुकीचा परवाना बहाल करण्यात आल्याची टीका दूध उत्पादकांनी केली आहे.

केंद्र शासनाने गाय दुधाचे निकष एक वर्षापूर्वीच बदलले होते. मात्र, शेतकऱ्यांपासून ते दडवून ठेवण्यात आले. केंद्राने ३.२ फॅट व ८.३ ‘एसएनएफ’ला गाय दूध म्हणून मान्यता दिली होती. मात्र, राज्यात दुधाच्या लॉबीने ३.५ फॅट व ८.५ ‘एसएनएफ’ निकष शेतकऱ्यांच्या माथी मारला,’’ असे सूत्रांचे म्हणणे आहे.

शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील म्हणाले, की ‘एसएनएफ’च्या बाबतीत शासनाने शेतकऱ्यांची लुटमार केलेली आहे. शेतकऱ्यांची अवस्था लांडग्यांच्या कचाट्यात सापडलेल्या कोकरूसारखी झाली आहे. आंदोलन करा की संघर्ष करा. शेतकऱ्यांची लुट होणार म्हणजे होणार, अशीच भूमिका घेतली जात आहे.

दुधाला प्रतिलिटर २५ रुपये भाव देण्याबाबत फॅट आणि ‘एसएनएफ’चे निकष ठरविताना दुग्धविकास विभागाने पद्धतशीरपणे संभ्रम तयार केला होता, असे शेतकरी प्रतिनिधींचे म्हणणे आहे. आधी फक्त फॅटचे निकष जाहीर करण्यात आले व ‘एसएनएफ’चा मुद्दा वगळण्यात आला. आता ‘एसएनएफ’चा निकष जाहीर करताना दुधाच्या भेसळीला आमंत्रण देण्यात आले आहे, असे दूध उत्पादकांनी सांगितले.

‘‘राज्याच्या पशुसंवर्धन व दुग्धविकास विभागाने दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींना अजिबात विचारात घेतले नाही. त्याऐवजी खासगी डेअरीचालक व सहकारी दूध संघांनी सूचविल्याप्रमाणे ‘एसएनएफ’चे निकष ठरविले. ८.५ टक्के ‘एसएनएफ’च्या खाली प्रतिपॉईंट २० पैसे कपात अपेक्षित असताना एक रुपया करण्यात आली आहे. एका पॉईंटसाठी एक रुपया जात असल्यास भेसळ केलेली बरी अशी मानसिकता यातून तयार करण्यात आली आहे, असे दूध उत्पादक कल्याणकारी संघाचे अध्यक्ष गुलाबराव डेरे यांनी व्यक्त केले.

अभ्यास न करताच काढले जीआर ः नरके इंडियन डेअरी असोसिएशनचे माजी अध्यक्ष अरूण नरके यांनी शासनाचे नवे निकष भेसळीला प्रोत्साहन देणारे असल्याचे नमूद केले आहे. फु़ड सेफ्टी अॅक्टमध्ये ३.२ व ८.३ चे निकष निश्चित करताना मोठी चूक करण्यात आलेली आहे. त्यामुळे दूध भेसळीला प्रोत्साहन आणि ग्राहकांना कमी प्रतीचे दूध देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच, दुधाला आधीचा प्रतिलिटर २७ रुपये व आता प्रतिलिटर २५ रुपये भाव देणारे दोन्ही जीआर अभ्यास न करता काढण्यात आलेले आहेत, असे श्री. नरके म्हणाले.

असे असतील गाय दुधाचे नवे खरेदीदर
फॅट  एसएनएफ  दर
३.२ ८.३ २२.१०
३.३  ८.३ २२.४०
३.४ ८.३ २२.७०
३.५  ८.३ २३.००
३.२ ८.४ २३.१०
३.३ ८.४  २३.४०
३.४  ८.४ २३.७०
३.५ ८.४ २४.००
३.२  ८.५ २४.१०
३.३ ८.५  २४.४०
 ३.४ ८.५  २४.७०
३.५ ८.५ २५.००

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Banana Farmer Issue : मेगारिचार्ज योजनेसह केळीचे प्रश्‍न प्रलंबित

Water Scarcity : पाण्याच्या आशेने करमाळ्यात विहिरींची खोदाई

Sharad Joshi : शरद जोशींचा अंगारमळा लवकरच इतिहास जमा होईल...

Kharif Season : खते, बी-बियाणे वेळेत उपलब्ध करा

Crop Insurance : केळी विमाधारक वादळात नुकसानीच्या परताव्यांपासून वंचित

SCROLL FOR NEXT