Change the pattern of traditional farming: Giriraj Singh
Change the pattern of traditional farming: Giriraj Singh 
मुख्य बातम्या

पारंपरिक शेतीचा पॅटर्न बदला ः गिरिराज सिंग

टीम अॅग्रोवन

नागपूर ः धान्य आणि पारंपरिक शेतीच्या बळावर उत्कर्ष शक्‍य नसल्याचे अनेकदा सिद्ध झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आर्थिक प्रगतीकरिता शेतीपूरक दुग्धव्यवसायाची कास धरावी, असे आवाहन केंद्रीय दुग्धविकास व पशुधन विकासमंत्री गिरिराज सिंग यांनी केले. 

ॲग्रोव्हिजन कृषी प्रदर्शनाच्या निमित्ताने आयोजित परिसंवादात ते बोलत होते. परिषदेचे उद्घाटन गिरिराज सिंग यांच्या हस्ते करण्यात आले. 

या वेळी नॅशनल डेअरी डेव्हल्पमेंट बोर्डाचे अध्यक्ष दिलीप रथ, डॉ. सी. डी. मायी, रवींद्र बोरटकर, अधिष्ठाता प्रशांत वासनिक, कापूस संशोधन केंद्राचे संचालक एम. बी. पाटील, पी. के. घोष, एन. पी. दक्षिणकर, डॉ. आर. डी. कोकणे उपस्थित होते. 

गिरिराज सिंग म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांनी पिकाचा पॅटर्न बदलण्याची गरज आहे. सध्या भारत दुग्ध उत्पादनात अग्रणी आहे. पण त्याचे उत्पादन मूल्य अधिक असल्यामुळे हा व्यवसाय परवडत नाही. शेतकऱ्यांनी सरासरी दोन किंवा पाच गायी पाळाव्या, त्यापासून सेंद्रीय खत, गांडूळखताची निर्मिती होईल. त्यावर आधारित चारा उत्पादन अणि सोबतीला कुक्‍कुटपालन केल्यास कोंबड्यांना यातून खाद्य मिळेल व दूध चारा, पशुखाद्य, बायोगॅस, शेतीला उत्तम खत असे अनेक पर्याय उपलब्ध होतील. अशा अनेक पर्यायांतूनच आर्थिक संपन्नता नांदेल. आगामी दहा वर्षांत या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर विदेशी गुंतवणूक अपेक्षित आहे. या सोबतच दूध उत्पादनानंतर त्यावर प्रक्रिया करणारे उद्योग येतील आणि शेतकऱ्यांना फायदा होईल. आगामी काळात अन्नप्रक्रिया उद्योगातील व्यक्‍तीच देशाचे नेतृत्व करेल,’’ असा विश्‍वास त्यांनी व्यक्‍त केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Production : सांगलीत साखर उत्पादनात सात लाख क्विंटलने वाढ

MahaRally Meeting : धुळ्यात महारॅलीची प्रशासनाकडून जय्यत तयारी

Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

Kharif Sowing : साडेसात लाख हेक्टरवर जिल्ह्यात खरिपाचा पेरा

Shaktipeeth mahamarg : 'रस्त्यांवरच्या लढाईची शेतकऱ्यांनी तयारी करावी', शक्तिपीठ विरोधात शेतकऱ्यांची एकजूठ

SCROLL FOR NEXT