चंद्रपुरात उच्चांकी ४३.८ अंश तापमान 
मुख्य बातम्या

चंद्रपुरात उच्चांकी ४३.८ अंश तापमान

शुक्रवारी (ता. २) सकाळी चोवीस तासांत चंद्रपूर येथे देशातील उच्चांकी ४३.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

टीम अॅग्रोवन

पुणे : एप्रिल महिना सुरू झाल्याने विदर्भातील कमाल तापमानात चांगलीच वाढ होऊ लागली आहे. येत्या काळात उन्हाचा चटका आणखी वाढणार आहे. त्यामुळे कमाल तापमानात आखणी वाढ होईल. शुक्रवारी (ता. २) सकाळी चोवीस तासांत चंद्रपूर येथे देशातील उच्चांकी ४३.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.  

सध्या राज्यात हवामान कोरडे आहे. त्यामुळे उन्हाचा चटका वाढू लागला आहे. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात कमाल तापमानात चांगलीच वाढ झाली आहे. विदर्भात गोंदिया, बुलडाणा वगळता सर्वच भागात कमाल तापमान चाळीस अंश सेल्सिअसवर गेले आहे. मराठवाड्यातही उन्हाच्या झळा तीव्र होत आहे.

औरंगाबाद भागात तापमानात काहीशी घट असली तरी उर्वरित भागात कमाल तापमान चाळीस पेक्षा अधिक आहे. मध्य महाराष्ट्रात उन्हाचा चटका कमीअधिक स्वरूपात आहे. सोलापूरमध्ये ४०.२ अंश सेल्सिअस एवढे कमाल तापमान नोंदविले गेले असून इतर पुणे, नगर, नाशिक, कोल्हापूर, जळगाव भागात कमाल तापमान ३१ ते ३८ दरम्यान होते.

कोकणातही उन्हाचा काहीसा कमी असल्याने कमाल तापमान ३० ते ३४ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. राज्यात कमाल तापमानासह किमान तापमानातही वाढ होत आहे. उच्चांकी तापमान नोंदविलेल्या चंद्रपूर येथील कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत तीन अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. तर, किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उणे १.३ अंश घट होऊन पुणे येथे १६.६ अंश सेल्सिअसचे सर्वात कमी तापमान नोंदविले गेले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT