चंद्रकांत पाटील यांचा कोथरूडमधून अर्ज दाखल 
चंद्रकांत पाटील यांचा कोथरूडमधून अर्ज दाखल  
मुख्य बातम्या

चंद्रकांत पाटील यांचा कोथरूडमधून अर्ज दाखल 

टीम अॅग्रोवन

पुणे ः कोथरूड मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झालेले भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज गुरुवारी (ता. ३) दाखल केला. सकाळी कोथरूडच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्‍वारुढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पाटील यांची भव्य मिरवणूक काढली होती. या वेळी विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी यांच्यासह शिवसेनेचे स्थानिक नेते शाम देशपांडे आणि भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

पाटील यांची कोथरूडमधून उमेदवारी जाहीर झाल्यावर विद्यमान आमदार कुलकर्णी नाराज झाल्या होत्या. दरम्यान बुधवारी (ता. २) पक्षाच्या झालेल्या मेळाव्यात त्यांनी नाराजी व्यक्त करीत पाटील यांना सर्वाधिक मतांनी विजयी करणार असल्याचा निर्धार व्यक्त केला. तर शिवसेनेकडून इच्छुक असलेले आणि बंडखोरीचा इशारा दिलेले माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांनी अद्याप आपला निर्णय जाहीर केलेला नाही. तर कोथरूडचे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्र शशिकांत सुतार हे आज पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अनुपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Animal Care : वाढत्या उष्णतेचा पशुधनास फटका

Public Well Policy : सार्वजनिक विहिरींच्या पुनरुज्जीवनावर धोरण काय?

Agriculture Irrigation : ‘म्हैसाळ’चे पाणी माडग्याळ शिवारात

Jalgaon Lok Sabha : ...तर जळगावचे चार खासदार पोहोचतील लोकसभेत

Banana Orchard Burn : सातपुड्याच्या पायथ्याशी केळी बागा करपल्या

SCROLL FOR NEXT