'चंद्र'पूर पुन्हा ४६ अंशांवर !
'चंद्र'पूर पुन्हा ४६ अंशांवर ! 
मुख्य बातम्या

'चंद्र'पूर पुन्हा ४६ अंशांवर !

टीम अॅग्रोवन

पुणे : पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान असल्याने राज्यात ढग गोळा होऊ लागेल आहेत. वाढलेली उष्णता आणि अंशत: ढगाळ हवामान यामुळे उकाड्यातही वाढ झाली अाहे. उद्यापासून (ता. ११) राज्यात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली अाहे. दोन दिवसांपासून वाहणाऱ्या वाऱ्यामुळे घटलेले तापमान पुन्हा वाढणार आहे. विदर्भात उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचे हवामान विभागाने स्षप्ट केले आहे. उत्तर भारतात असलेल्या धुळीच्या वादळाची स्थिती निवळून गेल्यानंतर उत्तर प्रदेश ते विदर्भापर्यंत असलेला कमी दाबाच पट्टा विरून गेला आहे. या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात वाऱ्यांचा वेग वाढून तापमानात १ ते २ अंशांची घट झाली होती. विदर्भात मात्र तापमानाचा पारा वाढला होता. बुधवारी (ता. ९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भातील चंद्रपूर येथे राज्यातील उचांकी ४६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्रात तापमानाचा पारा ३२ ते ४२ अंश सेल्सिअस, कोकणात ३३ ते ३४ अंशाच्या आसपास आहे. तर विदर्भात कमी झालेले तापमान पुन्हा वाढू लागले आहे. विदर्भात बहुतांशी ठिकाणी तापमान ४३ अंशांच्या पुढे गेले आहेत. तर मराठवाड्यात तापमान ३९ ते ४३ अंशांच्या जवळपास आहे. बुधवारी (ता. ९) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३७.६, नगर ४३.०, जळगाव ४२.८, कोल्हापूर ३७.५, महाबळेश्वर ३२.२, मालेगाव ४२.२, नाशिक ३८.१, सांगली ३९.०, सातारा ३९.७, सोलापूर ४२.१, मुंबई ३३.५, रत्नागिरी ३४.२, डहाणू ३४.७, आैरंगाबाद ३९.५, परभणी ४३.६, अकोला ४३.०, अमरावती ४२.८, बुलडाणा ३९.८, चंद्रपूर ४६.०, गोंदिया ४२.८, नागपूर ४४.४, वर्धा ४४.०, यवतमाळ ४३.०. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

Agriculture Share : शेती निम्म्या हिश्‍शाने देण्याकडे शेतकऱ्यांचा कल

Orchard Cultivation : ‘मनरेगा’अंतर्गत फळबाग लागवडीत कृषी विभाग अव्वल

Agrowon Sanvad : आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने शेती करावी

SCROLL FOR NEXT