Chance of rain in Vidarbha, Marathwada from tomorrow
Chance of rain in Vidarbha, Marathwada from tomorrow 
मुख्य बातम्या

विदर्भ, मराठवाड्यात उद्यापासून पावसाची शक्यता

टीम अॅग्रोवन

पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) संपूर्ण महाराष्ट्रातून माघार घेत राज्याचा निरोप घेतला आहे. राज्याच्या अनेक भागांत पावसाने उघडीप असली, तरी उद्यापासून (ता. ६) विदर्भासह मराठवाड्याच्या काही जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्यता आहे. आज (ता. १५) राज्याच्या बहुतांशी भागात हवामान मुख्यत: कोरडे राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात तयार झालेली कमी दाबाची क्षेत्र त्यांना लागूनच आकाशात चक्राकार वारे वाहत आहे. या कमी दाब क्षेत्रांच्या प्रणाली दरम्यान पूर्व पश्‍चिम हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. त्यामुळे पावसाला पोषक हवामान झाल्याने दक्षिण, पूर्व आणि उत्तर भारतातील राज्यांमध्ये पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. विदर्भ, मराठवाड्यातही तीन, चार दिवस विजांसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 

दोन्ही समुद्रांत कमी दाबाचे क्षेत्र  बंगालच्या उपसागरात पूर्व मध्य भागात कमी दाबाचे क्षेत्राची निर्मिती झाली आहे. आज (ता. १५) ही प्रणाली ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याकडे येणार आहे. यातच अरबी समुद्रातही लक्षद्वीप बेटांजवळ आणखी एक कमी दाब क्षेत्र तयार झाले आहे. उद्यापर्यंत (ता. १६) हे क्षेत्र केरळच्या किनाऱ्याकडे येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orange Farmer : निवडणूक काळात संत्रा उत्पादक उपेक्षित

Chara Chavani : चारा छावण्या सुरू करण्याची पशुपालकांची मागणी

Cotton Sowing : महाराष्ट्रात कापसाचा पेरा राहणार ४२ लाख हेक्टरवर

Animal Heat Stress : वाढत्या उष्म्याचा पशुधनाला धोका

Agriculture Technology : शेती तंत्रज्ञान, पिकांबाबत शेतकरी साक्षर असणे गरजेचे

SCROLL FOR NEXT