जोरदार पावसाची शक्यता
जोरदार पावसाची शक्यता 
मुख्य बातम्या

जोरदार पावसाची शक्यता

टीम अॅग्रोवन

पुणे : ढगाळ वातावरणामुळे उकाडा वाढला आहे. तसेच कमाल तापमानात ही वाढ झाली आहे. काही भागांत पावसासाठी पोषक वातावरणाची स्थिती झाल्याने कमाल तापमानात काही अंशी घट झाली आहे. दरम्यान, येत्या चार ते पाच दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी अवकाळी पाऊस पडणार असून, अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविली.  

सध्या सकाळपासून वातावरणात बदल होत आहे. सकाळी काही अंशी ढगाळ वातावरण, तर दुपारी किंचित असलेले ऊन, तर सायंकाळी पुन्हा ढगाळ वातावरण अशी स्थिती असते. यामुळे कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत सात अंश सेल्सिअसपर्यंत घट झाली आहे. नांदेड, डहाणू येथे घट होऊन ३३ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदविले गेले.

विदर्भात कमाल तापमानाचा पारा अधिक वाढलेला होता. शुक्रवारी (ता. ९) सकाळी चोवीस तासांत विदर्भातील चंद्रपूर येथे सर्वाधिक ४३.४ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंदविले गेले. काही भागात किमान तापमानातही वाढ झाली असून, महाबळेश्‍वर येथे २० सेल्सिअस किमान तापमान नोंदविले गेले.

गेल्या तीन ते चार दिवसांपासून उत्तर प्रदेशचा पूर्व भाग आणि परिसर बिहार ते पूर्व विदर्भ, पूर्व मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या दरम्यान कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. तसेच विदर्भ ते दक्षिण तमिळनाडू, तेलंगाणा, कर्नाटक आणि रायलसीमा या दरम्यान कमी दाबाचा पट्टा असून, तो समुद्रसपाटीपासून ९०० मीटर उंचीवर आहे. मध्य प्रदेशाच्या दक्षिण भागातही चक्रीय स्थिती आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून दीड किलोमीटर उंचीवर आहे. याचा परिणाम राज्यातील वातावरणावर होत आहे.

येथे अवकाळीची शक्यता शनिवार ः रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, जालना, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ रविवार ः रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा.

विदर्भाच्या पूर्व भागात हलक्या सरी राज्यात दोन ते तीन दिवसांपासून पावसासाठी पोषक वातावरण बनले आहे. गुरुवारी रात्री छत्तीसगड आणि विदर्भाच्या काही भागांत पावसाच्या हलक्या सरी पडल्या. यामध्ये चंद्रपूरमधील सावळी ४.२ मिलिमीटर, गडचिरोलीतील अरमोरी १० मिलिमीटर, गोंदियातील सालेकसा ४.६ मिलिमीटर, यवतमाळमधील राळेगाव ३.१ मिलिमीटर पाऊस पडला. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

Agriculture Share : शेती निम्म्या हिश्‍शाने देण्याकडे शेतकऱ्यांचा कल

Orchard Cultivation : ‘मनरेगा’अंतर्गत फळबाग लागवडीत कृषी विभाग अव्वल

Agrowon Sanvad : आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने शेती करावी

SCROLL FOR NEXT