राज्यात पाऊस कमी होणार
राज्यात पाऊस कमी होणार 
मुख्य बातम्या

राज्यात पाऊस कमी होणार

टीम अॅग्रोवन

सोमवारपासून ढगाळ हवामानासह पावसाची उघडीप राहणार आहे. त्यामुळे परतीच्या मॉन्सूनला माघार घेण्यासाठी पोषक वातावरण तयार होत असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले. पुणे (प्रतिनिधी) ः राज्यातील पावसाचा जोर कमी होऊ लागला आहे. एक दोन दिवसात राज्यात कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात पाऊस पडणार आहे. सोमवारपासून ढगाळ हवामानासह पावसाची उघडीप राहणार आहे. त्यामुळे परतीच्या मॉन्सूनला माघार घेण्यासाठी पोषक वातावरण तयार होत असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले. गेल्या तीन ते चार दिवसापूर्वी अरबी समुद्राच्या पश्चिममध्य भागात चक्रिय वाऱ्याची स्थिती तयार झाली होती. ती स्थिती अजूनही कायम आहे. त्याचा परिणाम कोकण व महाराष्ट्रातील काही भागावर होत असल्याने तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. आज (ता.24) ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या जिल्हयात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. उद्या (ता.25) रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, पुणे, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्हयात तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. तर मराठवाडा काही अंशी ढगाळ हवामान राहणार असूनविदर्भात पावसाची उघडीप राहील. सध्या राज्यातील काही भागात सकाळपासून ऊन पडत आहे. त्यामुळे उकाड्यात वाढ झाली आहे. परिणामी कमाल तापमानात वाढ झाली आहे. जळगाव येथे ३५.३ अंश सेल्सिअस एवढ्या कमाल तापमानाची नोंद झाली आहे. तर काही ठिकाणी होत असलेल्या पावसामुळे हवेत गारवा तयार होत असल्याने किमान तापमानात चढउतार होत आहे. महाबळेश्वर येथे १८.४ अंश सेल्सिअसची सर्वात कमी किमान तापमान नोंदविले गेले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

World Veterinary Day : मानवी आरोग्यातही पशुवैद्यकाचे बहुमूल्य योगदान

Agricultural Exports : खेळखंडोबा शेतीमाल निर्यातीचा!

Lok Sabha Election 2024 : टपाली मतदानास १,६६२ मतदारांची पसंती

Lok Sabha Election 2024 : सात हजार कर्मचाऱ्यांना नोटीस पाठविण्यास सुरुवात

Banana Orchard Damage : सारी केळी भुईसपाट

SCROLL FOR NEXT