गुलाबी बोंड अळी व्यवस्थापन  प्रकल्पाची राष्ट्रीय पथकाकडून पाहणी
गुलाबी बोंड अळी व्यवस्थापन प्रकल्पाची राष्ट्रीय पथकाकडून पाहणी 
मुख्य बातम्या

गुलाबी बोंड अळी व्यवस्थापन प्रकल्पाची राष्ट्रीय पथकाकडून पाहणी

टीम अॅग्रोवन

जालना : जिल्ह्यातील वखारी येथील कपाशीमधील गुलाबी बोंड अळी व्यवस्थापन प्रकल्पाची राष्ट्रीय समीक्षा पथकाकडून पाहणी करण्यात आली. प्रकल्पांतर्गत एकात्मिक पद्धतीने गुलाबी बोंड अळी व्यवस्थापनाच्या फलश्रुतीची माहिती पथकाने जाणून घेतली.  कृषी विज्ञान केंद्र (खरपुडी) व राष्ट्रीय एकात्मीक कीड व्यवस्थापन केंद्र (नवी दिल्ली) यांच्या संयुक्‍त विद्यमाने वखारी येथे साठ एकरावर एकात्मिक किड व्यवस्थापनातून गुलाबी बोंड अळी नियंत्रणाचा प्रकल्प राबविण्यात आला. या प्रकल्पाला नुकतीच राष्ट्रीय स्तरावरील समीक्षा पथकाने भेट देऊन पाहणी केली. या वेळी शेतकऱ्यांशी संवादही पथकाच्या सदस्यांनी साधला. पथकामध्ये इंफाळ येथील केंद्रीय कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस. एन. पुरी, भारतीय कृषी संशोधन संस्था दिल्ली येथील कीटकशास्त्र विभागाचे माजी प्रमुख डॉ. एस. एन. सुशील, डॉ. टी. व्ही. सिंग, डॉ. एस. के. लोधा, राष्ट्रीय एकात्मीक कीड व्यवस्थापन केंद्र नवी दिल्लीचे संचालक डॉ. एच. आर. सरदाना यांचा समावेश होता.  शेतकरी निवृत्ती घुले, बळिराम घुले, सोपान घुले, रमेश काळे, श्रीराम आटोळे, दामोधर घुले, गजानन घुले, प्रल्हाद खैरे आदींनी प्रकल्पाच्या अंमलबजावणीमुळे गुलाबी बोंड अळीवर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवीने शक्‍य झाल्याची माहिती पथकाला दिली. वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख एस. व्ही. सोनुने यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्रकल्प प्रमुख डॉ. अजंता बिराह यांनी प्रकल्पाची सविस्तर माहिती दिली.  समीक्षा पथकाचे अध्यक्ष डॉ. पुरी यांनी प्रकल्पांतर्गत झालेल्या कामाविषयी समाधान व्यक्‍त केले. सूत्रसंचालन डॉ. अनुपकुमार यांनी; तर कीटकशास्त्रज्ञ प्रा. अजय मिटकरी यांनी आभार मानले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT