बारामती, जि. पुणे ः आगामी काळात सेंद्रिय शेतीला गती मिळणार आहे, विषमुक्त पिकांची मागणी जगात वाढत असल्याने ही बाब महत्त्वाची ठरणार आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले.
महाराष्ट्र ऑरगॅनिक ॲण्ड रेसिड्यू फ्री फार्मर्स असोसिएशन (मोर्फा) च्या पदाधिकाऱ्यांची राज्यस्तरीय बैठक नुकतीच बारामतीत झाली. त्या प्रसंगी पवार बोलत होते. सेंद्रिय शेतीच्या संदर्भात काही महत्त्वाच्या मुद्यांवर गरज पडल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत बैठक आयोजित करण्याचीही ग्वाही पवार यांनी या वेळी दिली. सेंद्रिय शेतीबाबत काही अडचणी असतील तर त्या निश्चितपणे सोडविण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
विषमुक्त अन्नाची चळवळ वेगाने पसरण्यास पवार यांच्या या बैठकीमुळे मोलाची मदत होईल, असा विश्वास मोर्फाचे अध्यक्ष अंकुश पडवळे यांनी व्यक्त केला. सेंद्रिय शेतीचा एकच ब्रँड करून मार्केटिंग करणे, ग्राहकांचा विश्वास संपादन करणे, पाच सहा पिकांची निर्यात करणे, विक्रीव्यवस्था व चांगली किंमत मिळवून देणे, रासायनिक वापर टाळणे अशा बाबींवर भर दिला जाणार आहे.
या प्रसंगी ‘मोर्फा’चे व्यवस्थापकीय संचालक युगेंद्र पवार, अध्यक्ष अंकुश पडवळे, सचिव प्रल्हाद वरे, उपाध्यक्षा स्वाती शिगांडे, सदाशिव सातव, सुदाम आप्पा इंगळे, अतुल शाह, वसुधा सरदार, डॉ. राजेश कोकरे, डॉ. प्रशांत नायकवडी, सुरेखा जाधव, नंदा भुजबळ, बाळासाहेब घोरपडे, प्रकाश पाटील, कल्याण काटे, दिलीप पाटील, प्रल्हाद बोरगड, प्रशांत महाजन, योगेश रायते, यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.
अन् पवार स्वतःच पोचले शेतकऱ्यांकडे... राज्यभरातून सेंद्रिय शेती करणारे शेतकरी बारामतीत आल्याचे समजल्यावर सगळ्यांना आपल्या घरी येण्यापेक्षा आपणच शेतकरी असतील तेथे येतो असे सांगत शरद पवार यांनी युगेंद्र पवार यांच्या निवासस्थानी येत सर्वांची भेट घेतल्याने शेतकऱ्यांना सुखद धक्का बसला. पवार यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर सेंद्रिय शेतीला अधिक चालना देण्याचा राज्यात प्रयत्न होईल, असा विश्वास युगेंद्र पवार यांनी व्यक्त केला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.