hiware bajar
hiware bajar 
मुख्य बातम्या

पद्मश्री जाहीर होताच हिवरेबाजारमध्ये जल्लोष

टीम अॅग्रोवन

नगर ः आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार व बीजमाता म्हणून प्रसिद्ध असलेल्या राहीबाई पोपेरे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्याने कृषी आणि ग्रामविकास क्षेत्रात आनंदाचे वातावरण आहे.  

पोपटराव पवार यांना भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार जाहीर होताच आदर्श गाव हिवरेबाजारमध्ये जल्लोष करण्यात आला. पेढे, साखर वाटली. पोपटराव पवार यांची गावकऱ्यांनी सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. महिलांनी औक्षण केले.  सलग तीस वर्षे लोकसहभागातून ग्रामविकास, जलसंधारणाच्या कामांसह विविध उपक्रम राबवून राज्यात आणि देशात आदर्श निर्माण केला. यासाठी प्रत्येकांचे योगदान आहे. शनिवारी भारत सरकारचे सवोच्च पद्म पुरस्कार जाहीर झाले. त्यात सामाजिक कामासाठीचा पद्मश्री पुरस्कार पोपटराव पवार यांना जाहीर झाला. पोपटरावांच्या रुपाने आतापर्यंतच्या इतिहासात सरपंचाला पहिल्यांदाच पद्मश्री जाहीर झाला आहे. पद्मश्री जाहीर झाल्याचे कळताच आदर्श गाव हिवरेबाजारमध्ये गावकऱ्यांनी जल्लोष केला.  शनिवारी सायंकाळी उशिरा गावकऱ्यांनी पोपटराव पवार यांची सवाद्य मिरवणूक काढत गुलालाची उधळण केली. पेढे, साखर वाटली.  महिला, नागरिक, शाळकरी मुले मिरवणुकीत सहभागी झाली होते. त्यांना गावांतील महिलांनी औक्षण केले. गावकऱ्यांनी त्यांचा सत्कार केला. ‘‘तीस वर्षांच्या अथक परिश्रमाचे हे फळ आहे. गावांतील प्रत्येक माणसाच्या कामाचा हा गौरव आहे,’’ अशी भावना या वेळी पोपटराव पवार यांनी व्यक्त केली. 

पुरस्कार मिळालेले मान्यवर  राज्यातील बारा जणांना पद्मश्री जाहीर करण्यात आला आहे. त्यात पोपटराव पवार (सामाजिक कार्य), राहीबाई पोपेरे (कृषी), जहीर खान (क्रीडा), कंगणा राणावत (कला), अदनान सामी (संगीत), सईद महेबूब शहा कादरी ऊर्फ सय्यदभाई (सामाजिक कार्य), सुरेश वाडकर (कला), एकता कपूर (कला), सरिता जोशी (कला), रमन गंगाखेडकर (विज्ञान व अभियांत्रिकी), करण जोहर (कला) डॉ. संड्रा देसा (वैद्यकीय) यांचा समावेश आहे. प्रतिक्रिया मला `पद्मश्री' सन्मान मिळाल्याचा आनंद झाला. पण हा माझ्या सहकारी महिला, बाएफ संस्था आणि मला नेहमी मदत करणाऱ्या माझ्या पतीसह कुटुंबीयांचा आणि माझ्या अकोले तालुक्‍यातील सर्व शेतकरी आणि हितचिंतकांचा सन्मान आहे.  - राहीबाई पोपेरे 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Stamp Duty : सातारा जिल्ह्यात पीककर्जासाठी ‘मुद्रांक शुल्क’ माफ

Onion Market : कांदा दरात घसरणीने उत्पादक अडचणीत

Water Scarcity : लोणी भापकर योजनेमुळे आठ गावे अन् ७८ वाड्या होणार टंचाईमुक्त

Co-operative Society : विकास सेवा सोसायट्यांवर आता ‘सीसीटीव्ही’चा ‘वॉच’

Silver Rate : चांदी दरात १४०० रुपयांची वाढ

SCROLL FOR NEXT