CCI stands to lose Rs
CCI stands to lose Rs 
मुख्य बातम्या

हिंगणघाट तालुक्‍यात सीसीआयकडे थकले तब्बल ३० कोटी

टीम अॅग्रोवन

वर्धा ः सीसीआयला कापूस देणाऱ्या हिंगणघाट तालुक्‍यातील तीन हजार शेतकऱ्यांना गेल्या महिनाभरापासून चुकाऱ्याची प्रतीक्षा लागली आहे. या शेतकऱ्यांकडून ५५ हजार क्‍विंटल कापसाची खरेदी करण्यात आली. त्यापोटी तब्बल ३० कोटी रुपये सीसीआयकडे थकीत आहेत. 

हिंगणघाट तालुका कापूस उत्पादन आणि विक्रीचे हब म्हणून ओळखला जातो. याच भागात कापसावर आधारीत प्रक्रिया उद्योगांची संख्या देखील मोठी आहे. व्यावसायिकांची कापसाची मागणीही अधिक राहते. हिंगणघाट तालुक्‍यात सीसीआयने १८ फेब्रुवारी ते १८ मार्च २०२० या महिनाभरात हिंगणघाटला तीन तर वडनेरमधील एका केंद्रातून खरेदी केली. 

तीन हजारांवर शेतकऱ्यांकडून ५५ हजार क्‍विंटल कापूस खरेदी करण्यात आला. खरेदी केलेल्या या कापसाचे ३० कोटी रुपये सीसीआयकडे थकीत आहेत. सुरुवातीला अवघ्या पाच ते सात दिवसात सीसीआयकडून चुकारे करण्यात आले. त्यानंतर यंत्रणा ढेपाळली असा आरोप होत आहे. सीसीआयने मात्र हे आरोप फेटाळत खाते क्रमांक चुकल्याने ही रक्‍कम संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात टाकता आली नाही, असा खुलासा केला आहे. खाते क्रमांकात दुरुस्तीचे काम झाल्यानंतर तत्काळ चुकारे संबंधितांच्या खात्यात जमा होतील.

कापसाच्या दरात तफावत खासगी बाजारात ४८०० रुपये क्‍विंटलने कापसाची खरेदी होत आहे. याउलट सीसीआयकडून हमीभावाने ५५५० रुपयांत कापसाची खरेदी होत आहे. दरात मोठी तफावत असल्याने शेतकऱ्यांचा कल सीसीआयला कापूस देण्याकडे अधिक आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weather Update : अकोला, सोलापुरात हंगामातील उच्चांकी तापमान

Indian Politics : चीनवरून काँग्रेसचा मोदी सरकारवर पुन्हा हल्लाबोल

Accident Insurance Scheme : अपघात विमा योजनेतून ४५० शेतकरी कुटुंबांना मदत

Banana Sunburn : उन्हाच्या तीव्रतेमुळे जळताहेत केळीची रोपे

Summer Heat : मालेगावात वैशाखाआधीच वणवा

SCROLL FOR NEXT