To CCI, Marketing Federation in Khandesh Millions of rupees were lost on farmers' cotton
To CCI, Marketing Federation in Khandesh Millions of rupees were lost on farmers' cotton 
मुख्य बातम्या

खानदेशात शेतकऱ्यांच्या कापसाचे लाखो रूपये अडकले

टीम अॅग्रोवन

जळगाव : खानदेशातील अनेक शेतकऱ्यांचे विकलेल्या कापसाचे लाखो रुपये कापूस महामंडळ (सीसीआय) व पणन महासंघाकडे अडकले आहेत. दोन महिने पूर्ण झाले तरीदेखील काहींना चुकारे मिळालेले नाहीत. दुसरीकडे हे चुकारे अदा करण्यासंबंधीच्या कामात महत्त्वाचे मानले जाणारे रनर कार्यरत नसल्याने ही प्रक्रिया होत नसल्याची माहिती आहे. 

धरणगाव, पाचोरा, भुसावळ, बोदवड, जामनेर, चाळीसगाव, जळगाव, चोपडा भागातील शेतकऱ्यांचे चुकारे अडकले आहेत. किमान एक ते दीड कोटी रुपये त्यासंबंधी आवश्‍यक आहेत. धरणगाव तालुक्‍यातील कल्याणे गावातील शेतकरी नितीन राजपूत यांनी फेब्रुवारीमध्ये कापसाची शासकीय खरेदी केंद्रात विक्री केली होती. परंतु, दोन-अडीच महिने झाले, तरीदेखील त्यांना हे चुकारे मिळालेले नाहीत. 

कापूस खरेदीपोटी चुकारे अदा करण्याची अंतिम जबाबदारी ‘सीसीआय'ची आहे. कारण, सीसीआय सर्वत्र कापसाची खरेदी करीत आहे. तर, पणन महासंघदेखील ‘सीसीआय'ची उपसंस्था किंवा एजंट म्हणून कापूस खरेदी करीत आहे. खानदेशातील खरेदी केंद्रांचे नियंत्रण, चुकारे अदा करण्याची कार्यवाही ‘सीसीआय'च्या औरंगाबाद येथील विभागीय कार्यालयातर्फे केली जाते. या कार्यालयात रोज कापूस खरेदीची बिले, इतर माहिती, शेतकऱ्यांचे बॅंक खाते क्रमांक पोचविले जातात. या कामासाठी ‘सीसीआय'तर्फे रनरची नियुक्ती केली जाते. हे रनर सध्या कार्यरत नाहीत. हे रनर पूर्वी एसटी बसने औरंगाबादला जायचे. परंतु, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नसल्याने त्यांच्यासाठी स्वतंत्र वाहनाची गरज आहे. 

वाहन उपलब्ध करून देणे, त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाची परवानगी घेणे व इतर परवानग्यांची आवश्‍यकता आहे. परंतु, हे काम करायला जॉब वर्कर्स व ‘सीसीआय'चे अधिकारी तयार नाहीत. एकमेकांकडे बोट दाखविण्याचे काम ही मंडळी करीत आहे. यामुळे चुकारे अदा होत नसल्याची माहिती एका जॉब वर्करने दिली.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weather Update : विदर्भात गारपिटीचा इशारा

Agriculture Update : गुणवत्तापूर्ण बियाणे, खते शेतकऱ्यांना द्या : इटनकर

Summer Weather : परभणीत दिवसाचा पारा ४३ अंशांवर

Water Stock : मराठवाड्यातील उपयुक्त पाणीसाठा ७ ते ८ टक्क्यांवर

Flower Rate : लग्नसराईमुळे फुलांच्या दरांत वाढ

SCROLL FOR NEXT