dada bhuse  
मुख्य बातम्या

खत तुटवडा प्रश्नी कृषिमंत्र्यांच्या दणक्यानंतर यंत्रणेला आली जाग

राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांच्या औरंगाबाद मधील रविवारच्या (ता. २१) अचानक भेटीनंतर कृषी विभाग खडबडून जागा झाला आहे. जिल्ह्यातील सर्व तालुकास्तर व जिल्हास्तरावरील भरारी पथकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

टीम अॅग्रोवन

औरंगाबाद : राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांच्या औरंगाबाद मधील रविवारच्या (ता. २१) अचानक भेटीनंतर कृषी विभाग खडबडून जागा झाला आहे. जिल्ह्यातील सर्व तालुकास्तर व जिल्हास्तरावरील भरारी पथकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कृषिमंत्र्याच्या भेटीतील संबंधित दुकानाचा परवाना निलंबित करण्यासोबतच जिल्ह्यातील प्रत्येक कृषी निविष्ठा विक्री केंद्रांवर योग्य दरात निविष्ठांची विक्री होती की नाही, सोबतच साठा किती उपलब्ध याची माहिती सातत्याने घेण्याचे सूचित करण्यात आल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. 

शेतकऱ्यांना खते, बियाणे मिळताहेत की नाही हे पाहण्यासाठी राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे अचानक रविवारी स्वत: शेतकरी बनून औरंगाबाद येथील बाजार समितीच्या आवारातील नवभारत फर्टीलायझर्स या दुकानात गेले. खते शिल्लक असतानाही दुकानदाराने देण्यास नकार दिल्यानंतर कृषिमंत्र्यांनी जिल्हा कृषी अधीक्षकांमार्फत त्या दुकानाचा आणि गोदामाचा पंचनामा केला. त्यात युरियाच्या गोण्या शिल्लक असल्याचे आढळून आल्याने दुकानदारावर कारवाईचे निर्देश दिले. सोबतच औरंगाबाद येथील कृषी विभागाच्या गुणवत्ता नियंत्रण अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचे निर्देशही कृषिमंत्र्यांनी दिले होते. या घटनेने सगळीकडेच चांगलीच खळबळ उडाली होती. 

रविवारच्या सर्व घटनाक्रमानंतर संबंधित दुकानाचा परवाना निलंबित करण्यात आल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. तुकाराम मोटे व जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी आनंद गंजेवार यांनी दिली. जिल्ह्यातील नऊ तालुक्यातील भरारी पथकासह जिल्हास्तरीय पथकाला सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रत्येक कृषी निविष्ठा विक्री केंद्रावर निविष्ठांची योग्य दरात विक्री होते की नाही, याची गुप्त चाचपणी करण्याची तसेच प्रत्येक निविष्ठा केंद्रांवर खत बियाणे उपलब्धता स्थिती नेमकी काय याविषयीची माहिती सातत्याने घेत राहण्याच्या सूचना देण्यात आल्याचे जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी श्री गंजेवार यांनी सांगितले.   

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Update: कोकण, घाटमाथा, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज

Drought Situation: दुष्काळस्थितीत यंत्रणांनी सतर्क राहावे : कृषिमंत्री भरणे

Ghodganga AGM Controversy: ‘घोडगंगा’च्या सभेत घोषणाबाजीने गोंधळ

Illegal Water Extraction: तलाव आटले, तरीही अवैध पाणीउपसा सुरू

Farmers Protest: २३ सप्टेंबरला मंत्र्यांना काजू, बदाम पाठवून राज्यभर आंदोलन, किसान सभेची घोषणा

SCROLL FOR NEXT