अकोला, बुलडाण्यात अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची लगबग
अकोला, बुलडाण्यात अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची लगबग 
मुख्य बातम्या

अकोला, बुलडाण्यात अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची लगबग

टीम अॅग्रोवन

अकोला : लोकसभा निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरिता अवघे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. सोमवारी (ता.२५) वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा मतदार संघात अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची लगबग दिसून आली.

अकोला लोकसभा मतदार संघाचे भाजपचे उमेदवार संजय धोत्रे यांनी शक्तीप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला. शहराचे आराध्यदैवत राजराजेश्वराचे दर्शन घेत ते हजारो समर्थकांसह जिल्हाधिकारी कार्यालयावर दाखल झाले. यावेळी त्यांच्यासोबत आमदार गोवर्धन शर्मा,गोपीकिशन बाजोरीया, प्रकाश भारसाकळे यांच्यासह भाजप-शिवसेना व अन्य समर्थक पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. अकोल्यात प्रमुख उमेदवारापैकी केवळ धोत्रे यांचा आतापर्यंत अर्ज दाखल झाला आहे.

या घडामोडींमध्ये रविवारी (ता.२४) काँग्रेसने अकोल्यासाठी गेल्या वेळचे उमेदवार हिदायत पटेल यांना उमेदरवारी जाहीर केली. या जागेसाठी शेवटपर्यंत काँग्रेसकडून नाव निश्चित केले जात नव्हते. जातीय मतदारांचे गणित लक्षात घेत काँग्रेसने पटेल यांना पुन्हा रिंगणात उतरविले. बहुजन वंचित आघाडीने मात्र अंतिम क्षणापर्यंत आपल्या उमेदवाराचे नाव जाहीर केले नव्हते. कदाचित  रात्री घडामोडी होऊन मंगळवारी आघाडीच्या उमेदवाराचे नाव जाहीर करून अर्ज दाखल केला जाईल. तसेच पटेल यांनाही अर्ज दाखल करण्यासाठी काही तासांचा अवघी मिळालेला आहे.

बुलडाण्यात प्रमुख उमेदवारांचे अर्ज दाखल बुलडाणा येथे शिवसेनेचे उमेदवार प्रतापराव जाधव यांनी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत भाजप-शिवसेना व समविचारी पक्षांचे कार्यकर्ते उपस्थित होते. बुलडाणा मतदार संघातून महाआघाडीचे राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ.राजेंद्र शिंगणे यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला. बुलडाण्यात यापुर्वी बहुजन वंचित आघाडीकडून बळीराम सिरस्कार यांनी अर्ज दाखल केला आहे. या जिल्हयात आता प्रमुख तीनही पक्षांचे उमेदवार रिंगणात उतरलेले आहेत. जिल्ह्यातील प्रमुख उमेदवारांच्या नावांची घोषणा आधीच झालेली असल्याने त्यांनी प्रचारालाही सुरुवात केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Animal Care : वाढत्या उष्णतेचा पशुधनास फटका

Public Well Policy : सार्वजनिक विहिरींच्या पुनरुज्जीवनावर धोरण काय?

Agriculture Irrigation : ‘म्हैसाळ’चे पाणी माडग्याळ शिवारात

Jalgaon Lok Sabha : ...तर जळगावचे चार खासदार पोहोचतील लोकसभेत

Banana Orchard Burn : सातपुड्याच्या पायथ्याशी केळी बागा करपल्या

SCROLL FOR NEXT