Buy maize with guaranteed price in Pune district`
Buy maize with guaranteed price in Pune district` 
मुख्य बातम्या

`पुणे जिल्ह्यात हमीभावाने मका खरेदी करा`

टीम अॅग्रोवन

पुणे ः ‘‘मका पिकांची काढणी सुरू आहे. शेतकरी मक्याची विक्री करत आहेत. मक्याची खरेदी हमीभावापेक्षा कमी किमतीत होत आहे. मका खरेदीत शेतकऱ्यांची लूट थांबवून आधारभूत किमतीने त्याची खरेदी करा. अन्यथा, आंदोलन छेडण्यात येईल,’’ असा इशारा पुणे जिल्हा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग रायते यांनी दिला.

राष्ट्रीय किसान मोर्चाचे इंदापूर तालुकाध्यक्ष सचिन देशमाने यांनीही मक्याची हमीभावाने खरेदी करण्याची मागणी केली. 

रायते म्हणाले, ‘‘बारामती बाजार समितीत सचिवांना भेटून आधारभूत किमतीपेक्षा कमी दराने खरेदी होत आहे. ते पुराव्यासह दाखवून दिले आहे. मका खरेदीचा हमीभाव १८५० रुपये आहे.  व्यापाऱ्यांनी त्यावर भाष्य करणे गरजेचे आहे. मात्र त्याप्रमाणे खरेदी होत नाही. प्रत्यक्षात वेगळेच चित्र आहे. ११०० ते १३०० रुपयांपर्यंत मका खरेदी होत आहे. शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांची पट्टी घेऊन शेतकरी संघटनेशी संपर्क कराव.’’ 

‘‘आधारभूत किमतीपेक्षा कमी दराने कमी खरेदी करणे पणन कायद्याप्रमाणे गुन्हा आहे. तरीही शेतकऱ्यांकडून आधारभूत किमतीपेक्षा कमी किमतीत खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांची दुकाने सील करावी. जमाखर्च ताळेबंद ताब्यात घ्यावे, अशी मागणी केली.

मागील काळात कमी किमतीत घेतलेल्या मका खरेदी फरकाची रक्कम वसूल करण्यासाठी संघटनेने पुढाकार घेतला आहे. यासाठी राज्यभर दौरा केला आहे. बारामती व इंदापूरसह इतर तालुके राहिले असून तेथेही दौरा केला जाणार आहे,’’ असेही रायते म्हणाले.

देशमाने म्हणाले, ‘‘कोरोनामुळे इंदापूर तालुक्यासह अन्य भागातील नागरिक त्रस्त आहेत. त्यात मध्यंतरी ओला दुष्काळसदृश स्थिती, पूरस्थितीमुळे तालुका होरपळून गेला आहे. इंदापूर तालुक्यासह अन्य तालुक्यांमध्ये मका पीक बऱ्यापैकी घेतले आहे. सध्या अडचणीतील शेतकऱ्यांचा अनेक ठिकाणी अडते व व्यापारी कमी दराने खरेदी करून गैरफायदा घेत आहेत.’’

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orange Farmer : निवडणूक काळात संत्रा उत्पादक उपेक्षित

Chara Chavani : चारा छावण्या सुरू करण्याची पशुपालकांची मागणी

Cotton Sowing : महाराष्ट्रात कापसाचा पेरा राहणार ४२ लाख हेक्टरवर

Animal Heat Stress : वाढत्या उष्म्याचा पशुधनाला धोका

Agriculture Technology : शेती तंत्रज्ञान, पिकांबाबत शेतकरी साक्षर असणे गरजेचे

SCROLL FOR NEXT