Buy a gram after the intervention of MLA Mitkari
Buy a gram after the intervention of MLA Mitkari 
मुख्य बातम्या

आमदार मिटकरींच्या हस्तक्षेपानंतर हरभरा खरेदी

टीम अॅग्रोवन

अकोला ः या हंगामात नाफेडच्या हरभरा खरेदीचा १५ जुलै हा शेवटचा दिवस होता. या दिवशी दुपारचे तीन वाजले तरी नाफेडच्या केंद्रावर खरेदी केली जात नव्हती. या प्रकरणी शेतकरी जागर मंचाचे संयोजक मनोज तायडे यांनी आमदार अमोल मिटकरी यांना हा विषय सांगितला. त्यांनी तातडीने पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याशी संपर्क केल्यानंतर मूर्तिजापूर केंद्रावर मोजमाप करून घेण्यात आले.

नाफेडच्या हरभरा खरेदीचा बुधवार (ता. १५) हा शेवटचा दिवस होता. यानुसार मोबाईल संदेश आलेल्या शेतकऱ्यांनी आपला शेतमाल या केंद्रावर आणला होता. मात्र, दुपारी तीन वाजून गेले तरी यंत्रणा माल घ्यायला तयार नव्हती. वरिष्ठांकडून आदेश नसल्याचे शेतकऱ्यांना सांगण्यात आले. मात्र, या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर मनोज तायडे यांनी शेतकऱ्यांची ही अडचण आमदार मिटकरी यांना दिली. त्यांनी तातडीने जिल्हा उपनिबंधक कार्यालयात संपर्क केला. त्यानंतर ही मोजणी सुरू होईल अशी अपेक्षा होती. मात्र, पुन्हा तास दीड जाऊनही मोजणी सुरू न झाल्याने आमदार मिटकरी यांनी पणन मंत्री पाटील यांच्या कानावर हा मुद्दा घातला. त्यानंतर पाटील यांनी तातडीने सूत्रे हालविली.

जिल्ह्यातील सहकार यंत्रणा कामाला लागली. दुपारनंतर शेतकऱ्यांनी आणलेल्या शेतमालाचे मोजमाप सुरू करण्यात आले. नाफेड केंद्रावर यामुळे अधिकाऱ्यांची एकच तारांबळ उडाली.  मुर्तीजापूर तालुक्यातील शेतकरी यावेळी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : कापूस वायद्यांमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, गहू यांचे काय आहेत दर ?

Agriculture Update : विकसित केलेले वाण शेतकऱ्यांनी वापरावे : कलंत्रे

Fodder Shortage : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ११.८७ लाख टन चाऱ्याची उपलब्धता

PM Narendra Modi : 'मागील ६० वर्षांच्या काळात एससी/एसटी/ओबीसींची सर्वात वाईट अवस्था'; मोदी यांची काँग्रेसवर टीका 

Maharashtra Rain : उद्यापासून पावसाची स्थिती काय राहील? राज्यातील बहुतांशी ठिकाणी ऊन आणि पावसाचा अंदाज

SCROLL FOR NEXT