Buy cotton in Shegaon tomorrow
Buy cotton in Shegaon tomorrow 
मुख्य बातम्या

शेगाव येथे उद्यापासून कापूस खरेदी 

टीम अॅग्रोवन

बुलडाणा : शासनाच्या सूचनेनुसार शेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत गजानन जिनिंग ॲण्ड प्रेसिंग फॅक्टरी येथे महाराष्ट्र राज्य कापूस पणन महासंघाची कापूस खरेदी गुरुवार (ता. २३) पासून सुरू केली जाणार आहे. या ठिकाणी शेतकऱ्यांनी गर्दीचे नियोजन विचारात घेऊन त्यांचा कापूस विक्रीसाठी एसएमएसव्दारे किंवा मोबाईलव्दारे बाजार समितीने कळविल्यानुसारच आणण्याचे आवाहन केले आहे. 

कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांकडून नोंदणी केली जात आहे. त्यानुसार दिलेल्या तारखेप्रमाणे व वेळेनुसार आपला कापूस बाजार समितीमध्ये विक्रीस आणावा, असे आवाहन बाजार समितीचे सचिव विलास पुंडकर यांनी म्हटले आहे. सद्यःस्थितीत ‘कोरोना’ विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्याकरिता बाजार समितीमधील फलकांवरील आरोग्यविषयक सूचना देण्यात आल्या. 

पणन महासंघाच्या सूचनेनुसार तुर्तास नवीन कापूस नोंदणी प्रक्रिया तात्पुरत्या स्वरुपात बंद ठेवण्यात आली आहे. नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांचा कापूस मोजणी झाल्यानंतर नवीन कापूस नोंदणीबाबत बाजार समितीच्या सूचना फलकावर स्वतंत्रपणे जाहीर सूचना प्रसिद्ध करण्यात येईल. शेतकऱ्यांनी अधिक माहिती करीता निरीक्षक अ. ए. शेगोकार ( मो. ९४०४५००९९४), ना. पुं. डाबेराव (मो. ९८५०१५४३६६) यांच्याशी संपर्क साधावा, अशी माहिती बाजार समितीव्दारे देण्यात आली आहे. 

कापूस खरेदी केंद्रावर फक्त एफएक्यू दर्जाचा कापूस खरेदी करण्यात येईल. खरेदी केंद्रावर आलेली व्यक्ती शेतकरीच असल्याची खात्री करण्यासाठी संबंधित शेतकऱ्यांजवळ आधारकार्ड असणे बंधनकारक आहे. खरेदी केंद्रावर सर्व बाजार घटकांनी चेहऱ्यावर मास्क-रुमाल बांधणे बंधनकारक राहील. केंद्रावर अनावश्यक व विनाकारण कोणत्याही व्यक्तीस प्रवेश दिला जाणार नाही.    

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain : विदर्भात गारपीटीचा अंदाज; राज्यातील विविध भागात पुढील ५ दिवस पावसाचा अंदाज

Sugar Price Hike : ऐन निवडणुकीत साखरेच्या दरात तेजी, क्विंटलचा दर वाढल्याचा कोणाला फायदा?

Animal Ear Tagging : जनावरांचे टॅगिंग न केल्यास खरेदी-विक्रीला रोख लागणार

Unseasonal Rain : अवकाळी पावसाने नागपूर, भंडारा आणि चंद्रपुरात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान 

Chilli Cultivation : धाड परिसरात शेकडो हेक्टरवर यंदा झाली मिरचीची लागवड

SCROLL FOR NEXT