Buy cotton on the high leval in Aurangabad district
Buy cotton on the high leval in Aurangabad district 
मुख्य बातम्या

‘पणन’ची कापूस खरेदी उच्चांकी दिशेने

टीम अॅग्रोवन

औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघाकडून यंदा हमी दराने कापूस खरेदी होत आहे. ती उच्चांकी दिशेने वाटचाल करीत आहे. तर, खरेदी केलेल्या कापसाच्या साठवणुकीसाठी यंत्रणेची प्रचंड तारांबळ होत असल्याची स्थिती आहे. शिवाय सुरू झालेल्या हमी दराच्या तूर खरेदीमुळे या तारांबळीत भर पडण्याची शक्‍यता आहे. 

महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघाला यंदा स्थिती व आजवरचा अनुभव पाहता किमान १५ लाख क्‍विंटल कापूस महाराष्ट्रात खरेदी करावा लागेल, असे वाटत होते. परंतु, भारतीय कापूस महामंडळ व कापूस पणन महासंघाकडून हस्तक्षेप केल्यानंतरही बाजारातील दर वाढण्याचे नाव घेत नाहीत. त्यामुळे अपेक्षेच्या पुढे जाऊन कापसाची खरेदी करण्याची वेळ या यंत्रणांवर आली आहे. महासंघाची कापूस खरेदी  यंदा गत जवळपास दहा वर्षांतील कापूस खरेदीच्या तुलनेत उच्चांकी पातळीवर जाण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. 

प्राप्त माहितीनुसार, महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघाच्या राज्यभरातील केंद्रांच्या माध्यमातून १७ फेब्रुवारीअखेरपर्यंत जवळपास ३८ लाख ८४ हजार क्‍विंटल कापसाची निर्धारित हमी दराने खरेदी केली गेली. त्यामध्ये मराठवाड्यात खरेदी केलेल्या २७ लाख ६० हजार क्‍विंटल कापसासह विदर्भातील विविध केंद्रावरून खरेदी केलेल्या ११ लाख २३ हजार क्‍विंटल कापसाचा समावेश आहे. याआधी २००८-०९ मध्ये यंदाच्या आत्तापर्यंतच्या खरेदीच्या दुपटीपेक्षा जास्त खरेदी करावी लागली होती. 

औरंगाबाद येथील विभागीय कार्यालयाअंतर्गत औरंगाबाद व नगर जिल्ह्यांतील ९ केंद्रावरून १७ फेब्रुवारी अखेरपर्यंत ५ लाख ३२ हजार २५६ क्‍विंटल कापसाची खरेदी करण्यात आली. त्याच्या जवळपास ९० हजार गाठी साठविण्यात आल्या. उर्वरित कापसाच्या गाठी तयार करण्याची व त्या साठवणुकीसाठी गोडावून शोधण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

आजवर औरंगाबाद व नगर जिल्ह्यांतील जवळपास १७ ते १८ गोडावूनमध्ये खरेदी केलेल्या कापसाच्या गाठी साठविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. कापूस पणन महासंघाच्या राज्यभरातील एकूणच खरेदीचा डोलारा केवळ १६० कर्मचारी असलेल्या यंत्रणेच्या बळावर सुरू आहे हे विशेष. 

औरंगाबाद जिल्ह्यातील खरेदी (क्‍विंटल) 

बालानगर  १ लाख ६१ हजार
तुर्काबाद ७८ हजार ३५६
खामगाव फाटा ४३ हजार ९७३
सिल्लोड १ लाख ७ हजार ४४१
निलजगाव ३० हजार ८९६

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Production : सांगलीत साखर उत्पादनात सात लाख क्विंटलने वाढ

MahaRally Meeting : धुळ्यात महारॅलीची प्रशासनाकडून जय्यत तयारी

Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

Kharif Sowing : साडेसात लाख हेक्टरवर जिल्ह्यात खरिपाचा पेरा

Shaktipeeth mahamarg : 'रस्त्यांवरच्या लढाईची शेतकऱ्यांनी तयारी करावी', शक्तिपीठ विरोधात शेतकऱ्यांची एकजूठ

SCROLL FOR NEXT