Burnt nine acres of sugarcane due to short circuit
Burnt nine acres of sugarcane due to short circuit 
मुख्य बातम्या

शॉर्टसर्किटमुळे नऊ एकर ऊस जळून खाक

टीम अॅग्रोवन

डांगसौंदाणे, जि. नाशिक : सटाणा-डांगसौंदाणे रस्त्यावरील डांगसौदाणे शिवारातील दिगंबर बोरसे यांचा सात एकर तर वंदना काकुळते यांचा दोन एकर ऊस बुधवारी (ता. ४) आग लागून खाक झाला. वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे झालेल्या शॉर्टसर्किटमुळे या दोघा शेतकऱ्यांचे दहा लाखांपेक्षा अधिक रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप होत आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, सटाणा-डांगसौंदाणे रस्त्यावर एस्सार पेट्रोल पंपासमोर दिगंबर बोरसे यांचे व त्यांच्या कुटुंबीयांच्या नावे बागायती क्षेत्र आहे. या क्षेत्रापैकी अनुक्रमे दिगंबर बोरसे यांच्या नावावरील एक हेक्टर, पत्नीच्या नावे असलेले ८६आर क्षेत्र तर मुलगा योगेश यांच्या नावे एक हेक्टर क्षेत्र आहे. या संपूर्ण क्षेत्रात बोरसे यांनी आडसाली उसाची लागवड केली असून आता थोड्याच दिवसांत कारखान्याच्या गाळपास जाणारा हा ऊस आगीत संपूर्णपणे खाक झाला.

या उसाला केलेले ठिबक सिंचन ही जळाले आहे. याच क्षेत्रालगत असलेला वंदना काकुळते यांचा दोन एकर ऊसही जळाल्याने त्यांचेही चार लाखांचे नुकसान झाले. या उसाबरोबरच ठिबक सिंचनही संपूर्णपणे जळाले आहे. बोरसे यांच्या शेतात वीज वितरण कंपनीच्या तारांचे मोठे जाळे आहे. या तारा पूर्णपणे लोंबकळल्याने बोरसे यांनी वीज वितरणचे स्थानिक कर्मचारी अणि अधिकाऱ्यांना याची कल्पनाही दिली होती. मात्र नेहमीच्या सवयीप्रमाणे स्थानिक अधिकाऱ्याने दुर्लक्ष केल्याने नुकसान घडून आल्याचा आरोप होत आहे. याबाबत शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत असून, असंख्य शेतकऱ्यांच्या तक्रारी असताना कुठल्याही शेतकऱ्यांची दखल या अधिकाऱ्याकडून घेतली जात नसल्याने वीज वितरणाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांबद्दल मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली जात आहे. वीज वितरणच्या स्थानिक अधिकारी, कर्मचारी यांनी केली असून स्थानिक तलाठी अतिश कापडणीस यांनी महसूल विभागाच्या वरिष्ठांना माहिती देत पंचनामा केला.

हंगाम सुरू होताच हा ऊस कारखान्याला गाळपासाठी जाण्यासाठी तयार असताना आज आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. वीज वितरण कंपनीकडे वेळोवेळी तक्रार केली. मात्र तक्रारीची दखल न घेतल्याने आज मोठे नुकसान झाले. यामुळे नुकसानभरपाई मिळावी. - दिगंबर बोरसे, नुकसानग्रस्त शेतकरी

महसूल यंत्रणेकडून पंचनामा नुकसानीची पाहणी वीज वितरणच्या स्थानिक अधिकारी, कर्मचारी यांनी केली असून तलाठी अतिश कापडणीस यांनी पंचनामा केला. यात ऊस, ठिबक साहित्य मिळून १७ लाख ५० हजारांचे नुकसान पंचनाम्यात आहे. नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Milk Production : वाढत्या उष्णतेचा पशुधनावर थेट परिणाम, मुदतपूर्व प्रसूतीच्या घटनांत वाढ

Climate Change : जो स्वतःला बदलेल, तोच टिकेल

River Pollution : नदी प्रदूषणाबाबत गंभीर कधी होणार?

Animal Care : दूध, आरोग्य अन् अर्थकारणावरही परिणाम

Environment Emergency : सावधपणे ऐका निसर्गाच्या हाका...

SCROLL FOR NEXT