‘समृद्धी’च्या सोबतीने बुलेट ट्रेन धावणार? Bullet train to run with 'Samrudhi'? 
मुख्य बातम्या

‘समृद्धी’च्या सोबतीने बुलेट ट्रेन धावणार?

राज्यात साकारत असलेल्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाला लागूनच बुलेट ट्रेनचा कॉरिडोअर उभारण्याची शक्यता असून, या दृष्टीने सर्वेक्षण हातात घेण्यात आले आहे.

टीम अॅग्रोवन

अकोला : राज्यात साकारत असलेल्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाला लागूनच बुलेट ट्रेनचा कॉरिडोअर उभारण्याची शक्यता असून, या दृष्टीने सर्वेक्षण हातात घेण्यात आले आहे. काही ठिकाणी सॅटेलाईटच्या साह्याने शेतांमध्ये खुणा रोवण्यात आल्याने शेतकऱ्यांमधून विविध प्रश्‍न उपस्थित केल्या जाऊ लागले आहेत.

दोन वर्षांपूर्वी समृद्धी महामार्गाचे काम सुरू झाले त्यावेळी या रस्त्यासाठी मोठया प्रमाणात जमीन अधिग्रहीत करण्यात आली. या जमिनीचा योग्य मोबदला मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी ठिकठिकाणी आंदोलने केली. त्यानंतर शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला सुधारित दराने देण्यात आला. आता या समृद्धी महामार्गाचे काम बहुतांश पूर्णत्वास येत असतानाच आता या महामार्गाला लागून नागपूर ते मुंबई अशी बुलेट ट्रेन धावण्याची चिन्हे आहेत.

या हायस्पीड रेल्वे प्रकल्पाच्या अनुषंगाने सामाजिक परिणामाबाबत अभ्यास सुरू करण्यात आला आहे. पनवेल येथील एका संस्थेच्या वतीने हे सर्वेक्षण केले जात आहे. या अंतर्गत गावपातळीवर बाधित खातेदारांचे सामाजिक व आर्थिक सर्वेक्षण दोन महिन्यांत पूर्ण केले जाणार आहे. संभाव्य बाधित खातेदारांच्या याद्या या प्रकल्पाच्या अनुषंगाने जाहीर करण्यात आल्या आहेत. या शेतकऱ्यांचे काही म्हणणे असल्यास त्याबाबत माहिती गोळा केली जात आहे.

जमीन मालकी, प्रकार, जमिनीचा वापर, क्षेत्र, बागायती-कोरडवाहू, घर प्रमुख, जात, धर्म, घराची स्थिती, काही बांधकाम आहे का, जमिनीवर झाडे, विहीर, पाइपलाइन, असे विविध प्रश्‍नही भरून घेतले जात आहेत. या प्रकल्पाच्या अनुषंगाने एका पथकाने नुकतीच पाहणी सुद्धा केली आहे. रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीत असलेली जागा या प्रकल्पासाठी दिली जाण्याची शक्यता आहे. या बुलेट ट्रेनचा प्रकल्प पूर्ण झाल्यास सुमारे ७४१ किलोमीटर नागपूर ते मुंबई हे अंतर अवघ्या चार तासांत गाठता येणे शक्य होऊ शकेल, असा अंदाज वर्तविला जातो आहे.

विदर्भातील नागपूर, वर्धा, पुलगाव, कारंजालाड, मालेगाव, मेहकरसह जालना, औरंगाबाद, शिर्डी, नाशिक, इगतपुरी, शहापूर, मुंबई, अशा मार्गाने ही रेल्वे धावू शकते.  बुलेट ट्रेनचा हा संभाव्य प्रकल्प पूर्णत्वास गेल्यास शेती तसेच पर्यटनाच्या दृष्टीने एक नवीन दालन खुले होऊ शकते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT